चीन आणि पाकला धडा शिकवणार भारताची ‘K मिसाइल फॅमिली’, वाचा या मिसाइलची वैशिष्ट्ये

चीन आणि पाकला धडा शिकवणार भारताची ‘K मिसाइल फॅमिली’, वाचा या मिसाइलची वैशिष्ट्ये

भारतानं नुकतंच शौर्य मिसाइलची यशस्वी चाचणी केली. K-15 असं या मिसाइलचं नाव असून, हे भारताच्या दृष्टिनं किती महत्त्वाचं आहे? जाणून घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या वैज्ञानिक आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना 'मिसाईल मॅन' या नावानं ओळखलं जातं. त्याचबरोबर भारताच्या सैन्यदलांनी त्यांच्या सन्मानार्थ क्षेपणास्रांच्या एका फॅमिलीचं नाव 'K' मिसाइल फॅमिली असं ठेवलं आहे. भारतानं नुकतंच शौर्य मिसाइलची यशस्वी चाचणी केली. K-15 असं या मिसाइलचं नाव असून, हे भारताच्या दृष्टिनं किती महत्त्वाचं आहे तसंच याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

K मिसाइल फॅमिली म्हणजे काय

ही मिसाइल सबमरीन लाँच्ड बॅलेस्टिक मिसाइल (SLBM) आहेत. हे मिसाइल भारताच्या न्यूक्लियर सबमरीनमधून लाँच केलं जाऊ शकतं. Defence Research and Development Organisation म्हणजेच DRDO ने हे मिसाइल विकसित केलं असून डॉ. कलाम यांचं नाव दिलं आहे. हे मिसाइल खूपच शक्तीशाली असून जमीन, समुद्र आणि हवेतूनदेखील लाँच केलं जाऊ शकतं. 1990 पासून यासाठी संशोधन सुरु होतं. K-4 मिसाइलची क्षमता 3500 किलोमीटरपर्यंत आहे. तर या श्रेणीतील K-5 आणि K-6 या मिसाईलची रेंज 5000 आणि 6000 किलोमीटर दूरवर असलेल्या लक्ष्याचा भेद करू शकतात.

वाचा-चीन आणि पाकिस्तानला ‘राफेल’चा धाक, अमेरिकाही भारताच्या मदतीला येणार

यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणबुडीतील क्षेपणास्र (सबमरीन मिसाइल) तयार केली जातात. पण यामध्ये जमिनीवर आणि हवेमध्ये हल्ला करू शकणारी मिसाइलदेखील विकसित करण्यात आली आहेत. नुकत्याच चाचणी करण्यात आलेल्या शौर्य मिसाइलची मारक क्षमता कमी असून 750 किलोमीटरपर्यंत हे हल्ला करू शकतं. हे मिसाइल SLBM K-15 सागरिकाचे जमिनी व्हेरिएन्ट आहे.

वाचा-आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन

या मिसाइलची भारतासाठी गरज आणि भूमिका

भारतीय सैन्यासाठी आणि भारताच्या राजकीय रणनीतीसाठी ही मिसाइल फार महत्त्वाची आहेत. समुद्रामध्येदेखील यामुळे भारताची ताकद वाढणार असून, हवेमध्ये आणि पाण्यात हल्ला करण्यासाठी भारतीय सैन्यला यामुळे बळ मिळेल. त्यामुळे भारताची अण्विक शस्रांची शक्ती वाढणार आहे. भारताशेजारी असलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या नेहमी खुरापती सुरू असतात. पाकिस्ताननेहमी अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी देत असतो तर चीनने अण्विक पाणबुड्या विकसित केल्या आहेत. या धर्तीवर भारताच्या या मिसाईलला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताची ही मिसाइल सक्षम असून, सैन्याला बळ देत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 6, 2020, 7:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या