भारताचा जबरदस्त प्लान; LAC वर चिनी सैन्याला हालचाल करणंही होईल अवघड

भारताचा जबरदस्त प्लान; LAC वर चिनी सैन्याला हालचाल करणंही होईल अवघड

चीनला दणका देण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतात राफेल विमानं आणण्यात आली आहे. नव्या प्लानमुळे तर चिनी सैन्याला हालचाल करणं अवघड होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : चीनला दणका देण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतात राफेल विमानं आणण्यात आली आहे. सध्या चीन भारताविरोधात नेपाळची मदत घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यात LAC वरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरुच आहे. अशावेळी चिनी सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे.

आता भारताने एलएसीवर चिनी सैन्याच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवण्यासाठी 4 ते 6 सॅलेटाइट लावण्याची तयारी करीत आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने सांगितल्यानुसार या सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय सैन्याला चीनच्या हालचाली आणि विरोधी कारवायांवर नजर ठेवण्यात मदत होईल.

भारतीय सुरक्षा दलाला सॅटेलाइनची गरज तेव्हा निर्माण झाली जेव्हा चिनी सैन्याने एलएसीच्या दिशेने शिनजियांग क्षेत्रात अभ्यासाच्या नावावर मोठी शस्त्रे आणि तोफखान्यांसह 40000 हून अधिक सैनिक एकत्र केले आणि त्यांना भारतीय भागाच्या दिशेने पाठविण्यास सुरुवात केली.

हे वाचा-मोठी बातमी: चीनविरोधात LAC वर भारत आणखी 35000 जवान करणार तैनात

छोट्या छोट्या गोष्टींवर ठेवता येणार नजर

संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआयने सांगितले की भारतीय क्षेत्र आणि एलएसीवर खोल भागात चिनी दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सॅलेजाइट जरुरी आहेत. या सॅटेलाइट्समध्ये हाय रिजॉल्यूशन असणारे सेंन्सर आणि कॅमेरे आहेत. जे जवळून लक्ष देऊ शकतात. याच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या गोष्टींवर आणि व्यक्तींवरही लक्ष ठेवता येईल.

चीन आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यानंतर भारताने आणखी 47 अ‍ॅप्स बंद केले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 6, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या