भारतीयांना मोदींच्या 'आत्मनिर्भर' नाऱ्याचा विसर; काही सेकंदात चिनी स्मार्टफोनची मोठी विक्री

भारतीयांना मोदींच्या 'आत्मनिर्भर' नाऱ्याचा विसर; काही सेकंदात चिनी स्मार्टफोनची मोठी विक्री

भारत-चीन चकमकीनंतर काही नागरिकांनी आपल्या घरातील चिनी टिव्ही फेकून दिले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन (Amazon and Flipkart) पर आताच झालेल्या एका सेलमध्ये चीनचे स्मार्टफोम आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सची जोरदार विक्री झाली. भारत-चीन सीमा विवादानंतर चीन (China) च्या वस्तूंवर बहिष्कार आणि देशातील वस्तूंच्या खरेदीच्या मागणीला जोर आला होता.

मात्र ऑनलाइन ऑफरमुळे ग्राहक इतके आकर्षित झाले की ते मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा विसरून चिनी वस्तूंची खरेदीसाठी सरसावले. आत्मनिर्भरतेच्या नाऱ्यानंतर चिनी कंपन्यांवर ताण होता, मात्र या ऑनलाइन सेलमध्ये त्यांची विक्री दुप्पट झाली आहे.

हे वाचा-लाल किल्ल्यावर PM मोदींचे 2014 ते 2019 एकापेक्षा एक स्टायलिश लूक, पाहा PHOTOS

अॅमेझॉन इंडियाने सांगितले की आताच लॉन्च झालेल्या वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन 6 ते 7 अॉगस्टदरम्यान झालेल्या अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये सर्वाधित जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. तर रियलमी इंडिया (Realme India) च्या  प्रवक्तांनी सांगितले की दोन दिवसांच्या विक्रीत खूप फायदा झाला आहे. या सेलमध्ये एकून व्यावसायिक मूल्य 400 कोटी रुपयांच्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे वायर्ड ईयरफोन सर्वाधिक विकले जाणारे प्रॉडक्ट आहे. याशिवाय वर्क फ्रॉम होम प्रोडक्टदेखील मोठ्या संख्येने भारतीयांनी खरेदी केले.

भारत-चीन चकमकीनंतर चिनी वस्तूंविरोधात मोठा राग व्यक्त केला जात होता. अनेकांनी आपल्या घरातील चिनी वस्तू घराबाहेर फेकल्या होत्या. त्यातच चिनी मोबाइलची ऑनलाइन सेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे पुन्हा एका सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 11, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या