Home /News /india-china /

'भारताने आपली चूक सुधारावी'; PUBG सह 118 अॅपबंदीनंतर चीनचं धक्कादायक वक्तव्य

'भारताने आपली चूक सुधारावी'; PUBG सह 118 अॅपबंदीनंतर चीनचं धक्कादायक वक्तव्य

यापूर्वीही चीनच्या हॅलो, टिकटॉकसारख्या प्रसिद्ध अॅप्सवर बंदी आणली होती.

    नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या गंभीर तणावादरम्यान भारताने चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने बुधवारी 118 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी लावली. यामध्ये PUBG व्यतिरिक्त Baidu, APUS लॉन्चर प्रो सारख्या अॅप्सचाही समावेश आहे. भारताने चीनविरोधात घेतलेल्या निर्णयानंतर चीनची तंतरली आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) भारत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आणि भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे. न्यूज एजंसी रॉयटर्सनुसार चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ते चिनी मोबाइल अॅप बंद करण्यासाठी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करीत आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चिनी गुंतवणुकदार आणि सेवा देणाऱ्यांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ता गाओ फेंग यांनी सांगितले की, चीनने भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे. भारताने डेटा सुरक्षाचे कारण देत बुधवारी प्रसिद्ध व्हिडीओ गेम PUBG सह 118 मोबाइल अॅप्सवर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली होती. PUBG या अॅपमध्ये चीनची कंपनी टेनसेंट होल्डिंस लिमिटेडचा भागभांडवल होते. जे अॅप बॅन करण्यात आले त्यामध्ये पबजी व्यतिरिक्त Baidu, कॅमकार्ड बिजनेस, वीचॅट रीडिंग, वूव मीटिंग- टेनसेंट, व्हिडीओ कऑन्फेंसिंग, स्मार्ट अॅप लॉक, अॅपलॉकसारख्या अॅप्सचा सहभाग आहे. हे ही वाचा-India China : भारताने दिलं कडक उत्तर! 'चीननेच केली आगळीक म्हणून केली कारवाई' भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारताला घेरण्यासाठी आणि जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन भारता सभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनने यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. Military and Security Developments Involving the People's Republic of China (PRC) 2020' हा अहवाल पेंटागॉनने काँग्रेसला सादर केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: PUBG

    पुढील बातम्या