ड्रॅगन सावधान! चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान

ड्रॅगन सावधान! चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान

LAC आणि भारताच्या सीमा अशा दोन्ही फ्रंटवर लढण्यासाठी आणि चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण सज्ज- आर. के. एस भदौरिया

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : भारत-चीन सीमारेषेवर अद्यापही तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. चीनकडून सातत्यानं काहीना काही कुरापती सुरूच असतात. गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर लडाख इथे परिस्थिती गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या प्रमुखांनी मोठं विधान केलं आहे. सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. LAC आणि भारताच्या सीमा अशा दोन्ही फ्रंटवर लढण्यासाठी आणि चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण सज्ज असल्याचं हवाई दलाच्या प्रमुखांनी माहिती दिली आहे.

चीनविरोधात मोर्चेबांधणी आणि ड्रॅगच्या कुरापतींना आतपर्यंत भारत चोख प्रत्युत्तर देत आला आहे. युद्धाची वेळ आलीच तर हवाईदल सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आल्यापासून दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण शिगेला पोचले आहे. या तणावाचा फायदा पाकिस्तान घेत असून भारताच्या सीमेवर त्यांच्याही कुरापती वाढल्या आहेत. दोन्ही देशांसोबत सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य प्रत्येक शत्रूचा सामना करण्यास तयार आहे, असे हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा-युद्धाची वेळ आलीच तर चीनला धडा शिकवणार , लष्कराचा Action Plan तयार!

राफेल हवाई दलात आल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. राफेलच्या आगमनानंतर शत्रूलाही भीती आहे. राफेल आणि आपेचे हेलिकॉप्टर्स सैन्य दलाची शक्ती वाढवत आहेत. आम्ही सर्व पातळीवर युद्धासाठी सज्ज असल्याचं विधान हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी सांगितलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 2:22 PM IST

ताज्या बातम्या