लडाख 3 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख भेटीने (PM Narendra Modi Leh Visit) सगळ्या जगाचं लक्षं वेधून घेतलं. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर (India China Standoff) पंतप्रधानांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. कुणालाही थागपत्ता लागू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत CDS बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही सोबत होते. पंतप्रधान हवाई दलाच्या खास हेलिकॉप्टरने उतरले आणि थेट लष्करी अधिकाऱ्यांकडे गेले. तिथे त्यांना पहिल्या 10 मिनिटांमध्ये LACचा नकाशा आणि सद्य स्थितीची माहिती देण्यात आली.
हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पंतपधान मोदी थेट लष्करी अधिकाऱ्यांकडे गेले. तिथे पंतप्रधानांसाठी खास नकाशा तयार करण्यात आला होता. LACवर असलेली सध्याची स्थिती, चीनची सध्याची भूमिका, चिनी सैनिकांची असलेली उपस्थिती यासह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पंतप्रधानांनी ती माहिती लक्षपूर्वक ऐकून घेतली आणि मोजके प्रश्नही विचारले. या ब्रिफिंग नंतर पंतप्रधानांना वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या भागातला गेल्या दिवसांचा घटनाक्रम आणि भौगोलिक स्थिती याचीही माहिती दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भेट स्थगित केल्याच्या दुसर्याच दिवसाशी पंतप्रधान मोदींनी अचानक सीमेवर भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निमूमधील अग्रेषित ठिकाणी आहेत. मोदी पहाटे येथे तिथे पोहोचले. मोदी आज सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे.
जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील रुग्णालयात जाणार आहे. जखमी सैनिकांची करणार विचारपूरही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मोदी सध्या उपस्थित असलेले हे ठिकाण 11 हजार फूट अंतरावर, झांस्करच्या रांगेने वेढलेले आणि सिंधूच्या किनाऱ्याभोवती असणाऱ्या कठीण भूभागांपैकी हे एक आहे.
लेह दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी घेणार दिल्लीत बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
पंतप्रधानांनी दिला चीनला इशारा - "विस्तारवादाचं युग आता संपलं आहे. आता विकासाचं युग आहे. विकास हेच भविष्य आहे. विस्तारवादामुळे माणुसकी संपते आणि विस्तारवाद्यांना योग्य तो धडा मिळतो, याचं इतिहासात उदाहण आहे", असं मोदी म्हणाले.
#WATCH Prime Minister Narendra Modi briefed by senior officials in Nimmoo, Ladakh pic.twitter.com/uTWaaCwUVL
— ANI (@ANI) July 3, 2020
मोदींनी सुमारे 25 मिनिटं जवानांशी संवाद साधला. त्यामध्ये एवढ्या उंचीवर, टोकाच्या नैसर्गित परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यांनी पाठ थोपटली. 'या अवघड परिस्थितीत तुम्ही आपल्या मायभूमीची ढाल आहात', असं पंतप्रधान म्हणाले. लष्कर, वायुदल आणि इंडोतिबेटियन बॉर्डर पोलीस दलातल्या ( ITBP) जवानांशी ते बोलत होते.
संपादन - अजय कौटिकवार