Home /News /india-china /

India-China Standoff: LAC वर आज पुन्हा होणार कमांडर-स्तरीय बैठक, चीन घेणार माघार?

India-China Standoff: LAC वर आज पुन्हा होणार कमांडर-स्तरीय बैठक, चीन घेणार माघार?

गेल्या बैठकीत दोन्ही देशांनी एलएसीवर (India-China LAC Rift) अधिक सैन्य तैनात न करण्याबाबत सहमती दर्शविली, मात्र असे असले तरी संघर्षाची परिस्थिती अजूनही कायम आहे.

    लडाख, 12 ऑक्टोबर : भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्याय 5 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष (India-China Standoff) संपवण्यासाठी आज दोन्ही देशांचे कोअर कमांडर पुन्हा भेटणार आहेत. दोन्ही देशांच्या मुख्य कमांडर यांच्यातली ही सातवी बैठक आहे. गेल्या बैठकीत दोन्ही देशांनी एलएसीवर (India-China LAC Rift) अधिक सैन्य तैनात न करण्याबाबत सहमती दर्शविली, मात्र असे असले तरी संघर्षाची परिस्थिती अजूनही कायम आहे. दोन्ही देशांच्या कॉर्प कमांडर स्तराची (corp commanders meeting) सातवी बैठक चुशूलमध्ये आज होणार आहे. पहिल्यांदाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला हजर आहेत. त्याचबरोबर भारताने वरिष्ठ मुत्सद्दी सहसचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांना लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्यासोबत राहणार आहेत. भारत आज होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत लद्दाखमधील संघर्षाच्या मुद्द्यांवरून चीनकडे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करेल. लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चुशूल येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष बिंदूंमधून सैन्य मागे घेण्याचा रोडमॅप तयार करण्याचा या बैठकीचा उद्देश आहे. वाचा-भारताविरुद्ध चीनचं सायबर वॉर? सरकारने 500 पेक्षा जास्त अकाऊंट्स केले ब्लॉक लेफ्टिनेंट जनरल मेननही असतील उपस्थित मिळालेल्या माहितीनुसार, लेहमध्ये असलेल्या 14 व्या कॉर्पचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग 'फायर अँड फ्युरी' ही अखेरची बैठक होईल. 14 ऑक्टोबरपासून त्यांची जागा लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन घेतील. हरिंदरसिंग यांची त्यांच्या कॉर्प कमांडर लेव्हलची मुदत संपुष्टात आली असून आता त्यांची देहरादूनच्या आयएमए (इंडियन मिलिटरी Academyकॅडमी) चे कमांडर म्हणून नेमणूक झाली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत लेफ्टनंट जनरल मेनन हे भारतीय प्रतिनिधीमंडळातही उपस्थित असतील. वाचा-लडाख सीमेजवळ Air Forceची जय्यत तयारी, हे 3 VIDEO पाहून चीनला भरेल धडकी मागच्या वेळी मीटिंगमध्ये काय झाले होते? यापूर्वी, 21 सप्टेंबर रोजी मोल्दो येथील चिनी भागात, दोन्ही देशांमध्ये कॉर्प कमांडर स्तरावरील चर्चेची सहावी बैठक झाली होती. ही बैठक सुमारे 14 तास चालली. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही यात भाग घेतला. या बैठकीत दोन्ही देशांमधील ताण कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथे भारतीय लष्कराच्या 14 व्या लष्करांचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग होते. यावेळी भारताने हे स्पष्ट केले की जर तेथे डिसएन्गेजमेंट असेल तर ते संपूर्ण एलएसीवर असेल. अशा परिस्थितीत चिनी सैन्याने पॅंगॉंग त्सो लेकपासून सटी फिंगरपर्यंत 4-8 माघारी जावे, मात्र चिनी सैन्य यासाठी तयार नाही. अशा परिस्थितीत संघर्ष आणि संघर्षाची परिस्थिती अजूनही दीर्घकाळ टिकू शकते असे दिसत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: India china

    पुढील बातम्या