'विस्तारवाद्यांना शिक्षा मिळाल्याचा इतिहास आहे' लडाखमध्ये जवानांचं कौतुक करताना मोदींनी चीनला दिला थेट संदेश

'विस्तारवाद्यांना शिक्षा मिळाल्याचा इतिहास आहे' लडाखमध्ये जवानांचं कौतुक करताना मोदींनी चीनला दिला थेट संदेश

'तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे. तुमचं धैर्य जगाने पाहिलं आहे. तुमच्या त्यागामुळेच आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आम्ही पाहात आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याशी संवाद साधला.

भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी शुक्रवारी सकाळी अचानकच लडाखला गेले. तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. 'विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,' अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.

"विस्तारवादाचं युग आता संपलं आहे. आता विकासाचं युग आहे. विकास हेच भविष्य आहे. विस्तारवादामुळे माणुसकी संपते आणि विस्तारवाद्यांना योग्य तो धडा मिळतो, याचं इतिहासात उदाहण आहे", असं मोदी म्हणाले. मोदींनी सुमारे 25 मिनिटं जवानांशी संवाद साधला. त्यामध्ये एवढ्या उंचीवर, टोकाच्या नैसर्गित परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यांनी पाठ थोपटली. 'या अवघड परिस्थितीत तुम्ही आपल्या मायभूमीची ढाल आहात', असं पंतप्रधान म्हणाले. लष्कर, वायुदल आणि इंडोतिबेटियन बॉर्डर पोलीस दलातल्या ( ITBP) जवानांशी ते बोलत होते.

जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS

कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि नीमू जवळच्या एका फॉरवर्ड लोकेशनवर त्यांनी सैन्याधिकाऱ्यांसी बातचित केली. सिंध आणि झंस्कार नद्यांच्या खोऱ्यातला हा दुर्गम प्रदेश आहे. मोदी यांच्याबरोबर संरक्षण सेनाप्रमुख (CDS)बिपीन रावत आणि भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे हे लष्करी अधिकारीही लेहच्या दौऱ्यावर आहेत.

संकलन - अरुंधती

First published: July 3, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या