हवा आणि जमीनच नाही तर समुद्रातही चीनची दादागिरी रोखणार, असा आहे भारताचा प्लॅन

हवा आणि जमीनच नाही तर समुद्रातही चीनची दादागिरी रोखणार, असा आहे भारताचा प्लॅन

समुद्रातूनही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज, 6 पाणबुड्या खरेदी करण्यासाठी काढली निविदा

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : लडाखमध्ये भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावानंतर चीनच्या वेगवेगळ्या मार्गानं कुरापती सुरू आहेत. या दादागिरीला रोखण्यासाठी आणि चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झाला आहे. भारताच्या ताफ्यात नुकतेच 5 विमानंही दाखल झाली आहेत. हवा आणि जमीनच नाही तर आता समुद्रातही चीनची कुरघोडी रोखण्यासाठी भारतानं नवीन प्लॅन तयार केला आहे.

नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत 6 पाणबुड्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या पाणबुड्या खरेदी करण्यासाठी भारतानं 55000 कोटींची निविदा काढल्याची माहिती मिळाली आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असून लवकरच भारताकडे 6 पाणबुड्या येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.

चीनच्या नौदलाची शक्ती लक्षात घेऊन या पाणबुड्या खरेदी कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाणबु़ड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं भारताची सामरिक क्षमता वाढणाार आहे.

हे वाचा-भारताविरुद्ध सगळ्यात मोठा कट, मिसाइल साइट्स तयार करतंय चीन; पाहा सॅटेलाइट PHOTO

कशी असेल प्रक्रिया

संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 2 भारतीय शिपयार्ड आणि 5 परदेशी संरक्षण कंपन्यांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. 'मेक इन इंडिया' अंतर्गत हा सर्वात मोठे मोठा प्रकल्प असणार आहे. अंतिम यादीमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश एल अँड टी ग्रुप आणि गव्हर्नमेंट मझागाव डॉक लिमिटेड (एमडीएल) आहे तर निवडलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये थायसीनक्रूप मरीन सिस्टम (जर्मनी), नवानतिया (स्पेन) आणि नेवल ग्रुप (फ्रांस) यांचा समावेश आहे.

सूत्रांनी सांगितले की सुरुवातीला संरक्षण मंत्रालय एमडीएल आणि एल अॅण्ड टीला आरएफपी देईल आणि कागदपत्रे मिळाल्यानंतर दोन्ही कंपन्या त्यांचे तपशीलवार निविदा सादर करतील. यानंतर एल अॅण्ड टी आणि एमडीएलला निवडलेल्या पाच कंपन्यांमधून परदेशी भागीदार निवडावा लागेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 31, 2020, 8:31 AM IST

ताज्या बातम्या