Home /News /india-china /

हिंसाचाराच्या 7 दिवसानंतर चीन झुकलं, लष्करप्रमुख लेह-लडाख दौऱ्यावर

हिंसाचाराच्या 7 दिवसानंतर चीन झुकलं, लष्करप्रमुख लेह-लडाख दौऱ्यावर

मंगळवारी सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले आहेत.

    नवी दिल्ली, 23 जून : गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर अखेर 7 दिवसांनी चीन भारताच्या दबावापुढे झुकलं आहे. काल, चीन सीमेवर मॉल्डो इथं दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर महत्त्वाची चर्चा झाली. ही चर्चा चांगल्या पद्धतीने पार पडली असून पूर्व लडाखमधील चकमकीच्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेण्याचं मान्य केलं अशी माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले आहेत. ते लष्कराच्या 14 अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी नरवणे यांनी दिल्लीतल्या लष्कराच्या कमांडर्ससोबत बैठक घेतली. यामध्ये लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधल्या सीमा वादाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. भारत आणि चीनमधला दुसरी बैठक 11 तास चालली. 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर सोमवारी भारत आणि चीन यांच्यात झालेली दुसरी बैठक तब्बल 11 तास चालली. भारताकडून या बैठकीसाठी 14 व्या कोर्सेसचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत भारताने पूर्व लडाखच्या पँगोंग त्सो परिसरातून चिनी सैन्यानं माघार घ्यावी अशी मागणी केली होती. तर गलवानमध्ये झालेला हिंसक संघर्ष हा चीनचा सुनियोजित कट आणि क्रूर वर्णन होतं असं भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या चकमकीत चीनने त्यांच्याच कमांडिंग ऑफिसरसह दोन सैनिक ठार केले याची त्यांनी कबुली दिली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यूचा दावा करण्यात आला आहे. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी काटेरी तारांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला, त्यात 20 सैनिक ठार झाले. संकलन, संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Army chief, India china border, Ladakh

    पुढील बातम्या