नवी दिल्ली 17 जुलै: सीमेवर धिंगाणा घालणाऱ्या चीनला केंद्रातलं मोदी सरकार आणखी एक मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंतचा चीन विरोधातला हा सर्वात मोठा निर्णय असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनमधून होणाऱ्या थेट गुंतवणूकीला सरकार प्रतिबंध करण्याचा निर्णय घेऊ शकते. अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि SEBI यावर चर्चा करत असून सरकार लवकरच नवे नियम तयार करणार आहे.
या आधी सरकारने 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. त्याचबरोबर सरकारी प्रकल्पांमधून चिनी कंपन्यांना हद्दपार केलं होतं. हा निर्णय झाला तर चिनी कंपन्यांना भारतासारखी मोठी बाजारपेठ गमविण्याची वेळ येणार आहे.
या आधीच सरकारने कोरोनाच्या उद्रेकानंतर एक निर्णय घेत विदेशी गुंतवणूकीसाठी काही अटी घातल्या होत्या. भारताची सीमा लागून असलेल्या देशातल्या कंपन्यांना किंवा व्यक्तिंना जर भारतात गुंतवणूक करायची असेल तर त्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. बड्या कंपन्यांनी छोट्या भारतीय कंपन्यांना गिळंकृत करू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
भारताकडे वाकड्या नजरेने बघितल्यास याद राखा, संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा
गलवान खोऱ्यातल्या सीमा वादानंतर चिनने भारताचा विश्वास गमावला असं मानलं जातं. चीन अजस्त्र देश असला तरी भारतासारखी मोठी बाजारपेठ गमवणे हे चिनी कंपन्यांसाठी अडचणीचं ठरू शकते.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लडाख (Ladakh) आणि जम्मू-कश्मीरच्या (Jammu-Kashmir) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लेहमध्ये LACजवळच्या सैन्य ठिकाणांना भेटी दिल्या. त्यावेळी जवानांसमोर बोलतांना ते म्हणाले, भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मत कुणी करू नये, आम्ही एक इंचही जमीन कुणाला घेऊ देणार नाही. वाईट नजरेने भारताच्या भूमिकडे बघितल्यास याद राखा असा इशाराही त्यांनी चीनला दिला. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्करी ठिकाणांना भेटी देऊन चीनला ठणकावले होते.
सुरक्षा दलाची मोठी कारवाई, जैश-ए-मोहम्मदच्या IED एक्सपर्टसह 3 जण ठार
राजनाथसिंह म्हणाले, भारताच्या 130 कोटी जनतेला आपल्या सेनेचा गर्व आहे. इथे यायला मिळालं हा मी माझा गौरव समजतो. तुमच्या शौर्य आणि बलिदानाचा देशाचा अभिमान आहे असंही त्यांनी सांगितलं.