मराठी बातम्या /बातम्या /india-china /

India China : भारताने दिलं कडक उत्तर! 'चीननेच केली आगळीक म्हणून करावी लागली कारवाई'

India China : भारताने दिलं कडक उत्तर! 'चीननेच केली आगळीक म्हणून करावी लागली कारवाई'

भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांनी भारतावरच आरोप केल्याने भारताकडून आपली बाजू स्पष्ट आणि कडक शब्दांत सांगण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रथमच थेट नाव घेऊन आणि वेळ सांगत चीनमुळेच सीमेवर तणाव (India china tension) झाल्याचं स्पष्ट केलं आहे. चीननेच पूर्व लडाखच्या सीमेवर पँगाँग लेक परिसरात द्विपक्षीय सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. 29- 30 ऑगस्टला रात्रीनंतर पँगाँग लेकजवळ चिनी सैन्याने घुसखोरी करत सामंजस्य कराराचं उल्लंघन केलं असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, 'यापूर्वी सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या गोष्टी डावलून चीनने एकतर्फी सैन्य कारवाई केली. सीमेवरची सध्याची परिस्थिती बदलण्याचा चीनकडून प्रयत्न झाला.'  भारत- चीन सीमेवरचा तणाव वाढला, त्याला चीन जबाबदार आहे, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. चीनच्या या आगळिकीला उत्तर देण्यासाठीच भारताने सोमवारी कारवाई केली. देशाच्या सीमांचं रक्षण करणं हे आमच्या सैन्याचं कर्तव्य आहे. तेच त्यांनी केलं आहे, असं भारताने सांगितलं आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर चीनने पुन्हा भारताच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांनी भारतावरच आरोप केल्याने भारताकडून आपली बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्यू च्युनईंग यांनी सांगितले की, चीनने कधीच युद्धासाठी कोणत्याही देशाला चिथावणी दिली नाही. शिवाय दुसऱ्या देशांच्या सीमेतील 1 इंचही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. चिनी सीमेवरील पथकाने कधीच सीमा ओलांडली नाही. मात्र संवादातील अभाव असल्याचे दिसत आहे दोन दिवसांपूर्वी चीनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले होते. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली. चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होता. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या