ड्रॅगनसाठी भारत एकटाच पुरेसा; आव्हानानंतर चीनही झालं हैराण

ड्रॅगनसाठी भारत एकटाच पुरेसा; आव्हानानंतर चीनही झालं हैराण

गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनविरोधात जोरदार तयारी करीत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : चीनसोबत पूर्व लडाखवर सीमा विवादानंतर पूर्ण जग भारतासोबत उभं आहे. मात्र तरीही भारत एकट्याच्या बळावर चीनला आव्हान देऊ शकतं, असं विश्वास भारताकडे आहे. युरोपच्या एका थिंक टँकने दावा केला आहे की अमेरिकेने भारताला बीजिंग (Beijing) च्या विरोधात Quad चं गठन करण्याची संधी दिली होती.

मात्र भारताने दाखवलं आहे की तो स्वत: चीनसमोर कोणत्याही मुद्द्यावर मजबुतीने उभं राहू शकतो. सांगितले जात आहे की पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. यामध्ये काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. आणि दोन्ही देशांच्या सैन्याने काही विवादित जागांवरुन मागे गेली आहे, मात्र अद्यापही चिनी सैन्य देपसांग, गोरा आणि फिंगर भागात जाण्याचं नाव घेत नाही.

युरोपीय फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (EFSAS) यांनी एका समिक्षेत सांगितले की, 'पँगोंग त्सो में डिसइंगेजमेंटच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत चायनीज फिंगर 2 हून फिंगर 5  भागातून मागे हटले, मात्र रिज लाइन वर तैनात होते. चिनी सैनिक फिंगर 5 हून फिंगर 8 हून मागे हटावे यासाठी भारत प्रयत्न करीत आहे.' थिंक टँकनी सांगितले, '2017 मध्ये डोकलामप्रमाणे , ड्रैगनची आक्रमकतेविरोधात भारतीय राजकीय आणि सैन्य नेतृत्वकडून दाखविले गेलेल्या संकल्पामुळे चीन हैराण झालं आहे.

हे वाचा-गुगलचा चीनला दणका; 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या एका रिपोर्टचा हवाला देत EFSAS यांनी सांगितले की जोपर्यंत सैन्य आणि कुटनीतीच्या स्तरावर चर्चेच्या माध्यमातून सहमती होत नाही, तोपर्यंत मोठ्या कालावधीसाठी हा तणाव राहू शकतो. दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर अत्यंत कठीण वातावरणातही दोन्ही देशातील जवान कडाक्याच्या थंडीतही तैनात राहण्याच्या तयारीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading