श्रीनगर, 20 नोव्हेंबर : भारत आणि चीनमध्ये (India-Chine) वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सया खूप तणाव सुरु आहे. यामुळे एलसीवर तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. या तणावाच्या परिस्थितीत तेथील स्थानिक नागरिक देखील सैन्याला मोठ्या प्रमाणात मदत करताना दिसून येत आहेत. फॉर्वर्डस पोस्टवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी येथील नागरिक खाण्या पिण्याच्या वस्तू पुरवत आहेत. नागरिक सुकवलेल्या पनीरचं पोते भरून ते सैनिकांना पाठवत आहेत. स्थानिक भाषेत याला छुर्पे म्हटलं जात असून प्रोटीनचा खजिना असलेलं हे खाद्य कित्येक महिने खराब होत नाही.
त्याचबरोबर वाळवलेले साग देखील सैनिकांसाठी पाठवले असून गरम पाण्यात टाकून सैनिक हवं तेव्हा त्याचा आस्वाद लुटू शकतात. बार्लीचा अतिशय पौष्टिक आणि गरम तासीर सत्तू कडक हिवाळ्यामध्ये लडाखच्या लोकांना खूप उपयुक्त आहे. उंच डोंगरावर तैनात असलेल्या सैनिकांना पाठवले जात असून जेव्हा हवं तेव्हा गरम पाण्यात टाकून ते याचा आस्वाद घेऊ शकतात. तर दुसरीकडे चिनी ड्रॅगन चर्चेआड पुन्हा एकदा भारतीयांना धोका देण्याची तयारी करीत आहे. चीनच्या PLA सैन्याने अक्साई चीनमध्ये मागील 30 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे.
हे ही वाचा-चीनला टक्कर द्यायला तय्यार! आधुनिक बेड, हिटर्ससह लडाख सीमेवर अत्याधुनिक गाव
तसेच वेगाने रस्त्यांचे देखील बांधकाम करण्यात येणार आहे. चीनने पँगाँग लेकच्या फिंगर 6 ते 8 ला जोडणारा रस्ताही रुंद केला आहे. ज्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत चिनी सेनेला लवकरात लवकर भारताच्या भूभागात प्रवेश करता येईल. दरम्यान, या सर्व तयारीवरून दिसून येते कि, चीन अक्साई चीनमध्ये दीर्घकाळापर्यंत सैनिक तैनात करणार आहे. तसेच भारताबरोबर चर्चेतून दबाव देखील निर्माण करत आहे. याचदरम्यान सैन्य मागे घेण्यासाठी भारतीय आणि चीन सेनेमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. चीन त्यांचे सैन्य मागे घेण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे भारतीय सैन्याने देखील लडाखमध्ये मोठी तयारी सुरु केली असून या हिवाळ्यात सैनिकांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. हिवाळ्यात या ठिकाणी सैनिकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता चर्चेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china