Home /News /india-china /

गुगलचा चीनला दणका; 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

गुगलचा चीनला दणका; 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

चीनविरोधात भारतासह अमेरिका आणि अनेक देश एकत्र येत असल्याचे चित्र आहे.

    नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : चीनविरोधात भारतासह अमेरिका आणि अनेक देश एकत्र येत असल्याचे चित्र आहे. एलएसीवरही भारत चीनविरोधात तयारी करीत आहे. भारताने चीनच्या अॅपबंदीनंतर आता गुगलने चीनसंबंधित जवळपास 2500 हून अधिक यूट्यूब चॅनल डिलीट केले आहे. या चॅनलवरुन संशयास्पद आणि भ्रामक माहिती पसरवली जात होती, त्यामुळे ते शेअरिंग प्लॅटफॉर्मवरुन हटविल्याचे गुगल कंपनीने सांगितले आहे. एल्फाबेटची मालकी असलेली कंपनी गुगलने सांगितले की यूट्यूब चॅनलला एप्रिल आणि जून दरम्यान यूट्यूबवरुन हटविण्यात आलं आहे. चॅनल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कंटेट पोस्ट केले जात होते. परंतू यात पॉलिटिक्स संबंधित काही माहिती होती. गुगलने आपल्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. अद्याप गुगलने या चॅनलची नावे सांगितलेली नाही. यासंबंधित माहिती देताना सांगितले की ट्विटरवर सुद्धा अशातच सक्रिय असलेल्या व्हिडीओजची लिंक पाहण्यात आली आहे. याआधीच चुकीची माहिती पसरवीत असल्याचा दावा चीनने फेटाळून लावला आहे. दरम्यान आता भारताने एलएसीवर चिनी सैन्याच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवण्यासाठी 4 ते 6 सॅलेटाइट लावण्याची तयारी करीत आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने सांगितल्यानुसार या सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय सैन्याला चीनच्या हालचाली आणि विरोधी कारवायांवर नजर ठेवण्यात मदत होईल. भारतीय सुरक्षा दलाला सॅटेलाइनची गरज तेव्हा निर्माण झाली जेव्हा चिनी सैन्याने एलएसीच्या दिशेने शिनजियांग क्षेत्रात अभ्यासाच्या नावावर मोठी शस्त्रे आणि तोफखान्यांसह 40000 हून अधिक सैनिक एकत्र केले आणि त्यांना भारतीय भागाच्या दिशेने पाठविण्यास सुरुवात केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या