चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका देण्याची तयारी; गडकरींनी सांगितला काय आहे प्लान

चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका देण्याची तयारी; गडकरींनी सांगितला काय आहे प्लान

चीनला चहुबाजूंनी घेरण्याची तयारी केली जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : भारत-चीन सीमेवर आव्हान देणाऱ्या चीनला (China) दणका देण्यासाठी भारत सरकारकडून सैन्यासह आर्थिक बाबतीतही बरीच तयारी केली जात आहे. चीनहून विविध प्रकारे येणाऱ्या सामानांना प्रतिबंधित सूचीत समाविष्ट करण्यात आलं आहे. आणि आता अनेक वस्तुंवर आयात शुल्क (import duty) वाढविण्याची तयारी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) शनिवारी सांगितले की विशेष करुन स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी भारताला त्या भागातील आयात शुल्क वाढविण्यासाठी विचार करायला हवा, ज्यामध्ये आयात केलेल्या वस्तुंवर सर्वाधिक अवलंबून आहेत.

गडकरींनी सीआयआयच्या कार्यक्रमात सांगितले की ' कदाचित तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही, मात्र काही प्रकरणात आपल्याला आयात शुल्क वाढवावे लागतील. जोपर्यंत आपण चीनप्रमाणे उत्पादन वाढवत नाही, तोपर्यंत किंनत वाढणार नाही. यासाठी आपल्याला ड्यूटी वाढवावी लागेल आणि भारतीय मॅन्युफॅक्चरर्सृना वाढवावे लागेल. जेव्हा जास्त प्रमाणात उत्पादन होतं, तेव्हा स्वाभाविक स्वरुपात आपण याला प्रतिस्पर्दी बनू शकतो.

हे वाचा-भारताचा जबरदस्त प्लान; LAC वर चिनी सैन्याला हालचाल करणंही होईल अवघड

संपूर्ण देशात उद्योगांचं नेटवर्क

गडकरी यांनी उद्योगांना आवाहन केलं आहे की ते महानगर आणि विकसित शहरांपेक्षा ग्रामीण, गावोगावी, आदिवासी भागात उद्योगांचा एक नेटवर्क तयार करण्याकडे लक्ष द्यावे. ते म्हणाले, उद्योगपतींचे 90 टक्के लक्ष हे शहर आणि महानगरांमधील प्रमुख उद्योगांवर असतो, या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटतं. ग्रामीण, आदिवासी भागात खूप कमी लोक लक्ष देतात. या मानसिकता बदलणं गरजेचं आहे. भारताला महाशक्ती बनविण्यासाठी या मानसिकतेत बदल करायला हवा. गेल्या अनेक दिवसांपासून चीनला विविध प्रकारे घेरण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे. चीनचे अॅप बंद केल्यानंतर सीमेवरही भारतीय सैन्याची जोरदार तयारी सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या