India China Face off: चिनी सैन्याची घुसखोरी सिद्ध करणारी कागदपत्र संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून गायब

India China Face off: चिनी सैन्याची घुसखोरी सिद्ध करणारी कागदपत्र संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून गायब

चीनने मे महिन्यात पूर्व लडाख सीमेमध्ये घुसखोरी केली होती आणि त्यानंतर दोन देशांमध्ये हिंसक चकमक झाली. तेव्हापासून दोन्ही देशांतील परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : भारत आणि चीन (India China) यांच्यात अजूनही सीमा विवाद (Ladakh Border Dispute) सुरू आहे. रविवारी दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांची 10 तासात बैठक झाली. मात्र या बैठकीतही चीननं पांगोंग लेकजवळ असलेले सैन्य मागे घेण्यास नकार दिला. दरम्यान, आता प्रकरणाच्या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने ((Defense Ministry) अधिकृतपणे कबूल केले आहे की चीनने भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली आहे, मात्र ही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून डिलीट करण्यात आली आहेत.

चीनने मे महिन्यात पूर्व लडाख सीमेमध्ये घुसखोरी केली होती आणि त्यानंतर दोन देशांमध्ये हिंसक चकमक झाली. तेव्हापासून दोन्ही देशांतील परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याचे कर्नलसह 20 सैनिक शहीद झाले. या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरू झाल्या.

संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या एका कागदपत्रात असे म्हटले होते की, '5 मे पासून गलवानमध्ये चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की 17-18 मे रोजी चिनी सैन्यानं PP 17 A आणि पांगोंग लेकच्या नॉर्दर्न बँकमध्ये घुसखोरी केली होती. मात्र मंगळवारपासून एमओडी वेबसाइटच्या बातमी विभागात असलेले हे कागदपत्रे आता काढून टाकण्यात आले आहेत. MoD वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर the URL cannot be found असे दिसते.

वाचा-चीन ऐकण्यास नाही तयार; दोन्ही देशांच्या कमांडरांची बैठक राहणार निष्फळ

मंत्रालयाच्या कागदपत्रात असेही म्हटले होते की, 'हा वाद बराच काळ चालू राहू शकतो'. भारत आणि चीनमधील वाद संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या कॉर्प्स कमांडर यांच्यात 5 वेळा चर्चा झाली आहे. LaCवरील ताण कमी आहे, परंतु परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

वाचा-मोठी बातमी: चीनविरोधात LAC वर भारत आणखी 35000 जवान करणार तैनात

यापूर्वी स्वत: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही लेह दौऱ्यादरम्यान जवानांना संबोधित करतानाही तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते पण हा वाद कधी मिटेल अशी चिन्हे दिसत नाही आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 2:51 PM IST

ताज्या बातम्या