भारतातून चिनी नागरिकाला अटक; 2014 पासून दलाई लामांची माहिती करीत होता गोळा

भारतातून चिनी नागरिकाला अटक; 2014 पासून दलाई लामांची माहिती करीत होता गोळा

दलाई लामांची माहिती मिळविण्यासाठी या चिनी नागरिकांने अनेकांना लाच दिल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळविण्यासाठी त्याने चिनी अॅपची मदत घेतली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अटक केलेल्या चिनी नागरिक चार्ली पेंग (Charlie Peng) याच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. तपास एजंसियांनी मिळालेल्या माहितीनुसार चार्ली पेंग दिल्लीतील काही तिब्बटच्या भिक्षुकांच्या संपर्कात होता. त्याने दलाई लामा आणि त्यांच्या सहकार्यांबाबत माहिती एकत्र  करण्यासाठी कथित स्वरुपात त्यांना लाच दिली होती.

आयकर विभागाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, दिल्ली स्थित राहणाऱ्या काही लोकांना 2 लाख ते 3 लाखांपर्यंत लाच देण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या लोकांची ओळख पटविण्यात येत आहे. सुरुवातीच्या तपासात सांगितले जात आहे की चार्ली पेंग या कामात लोकांकडून चिनी अॅप व्ही चॅटच्या माध्यमातून संपर्क करीत होता. मजनू टिला या भागात बौद्ध धर्मावर अवलंबून राहणाऱ्यांची मोठी लोकसंख्या आहे. यासाठी ही शंका अधिक स्पष्ट होत आहे की चार्ली पेंग याने दलाई लामाची माहिती मिळविण्यासाठी लोकांशी संपर्क केला होता.

2014 मध्ये पहिल्यांदा भारतात आला होता चार्ली पेंग

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांना माहिती मिळाली आहे की चार्ली पेंग या कामात लोकांना चिनी अॅप व्ही चॅटच्या माध्यमातून संपर्कात आला होता. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी माहिती मिळाली आहे. सुत्रांनी हे देखील सांगितले की चार्ली पेंग उर्फ लुओ सांगने चौकशीदरम्यान महत्त्वाचे खुलासे केले आहे. पेंगने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले की तो 2014 मध्ये पहिल्यांदा भारतात आला होता. भारतात आल्यानंतर त्याने दिल्लीत नूडल्सचा बिझनेस सुरू केला. नूडल्सच्या बिझनेसच्या माध्यमातून तो पुढे गेला आणि हवाला रॅकेटपर्यंत पोहोचला.

Published by: Meenal Gangurde
First published: August 16, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या