चोराच्या उलट्या बोंबा! चीन म्हणतंय, आम्ही कोणत्याही देशाच्या सीमेत प्रवेश केला नाही

चोराच्या उलट्या बोंबा! चीन म्हणतंय, आम्ही कोणत्याही देशाच्या सीमेत प्रवेश केला नाही

गलवान खोऱ्यानंतर चीनने पुन्हा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळीही त्यांनी चीनचा डाव उधळून लावला.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर चीनने पुन्हा भारताच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचे डोळे मोठे झाले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्यू च्युनईंग यांनी सांगितले की, चीनने कधीच युद्धासाठी कोणत्याही देशाला चिथावणी दिली नाही. शिवाय दुसऱ्या देशांच्या सीमेतील 1 इंचही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. चिनी सीमेवरील पथकाने कधीच सीमा ओलांडली नाही. मात्र संवादातील अभाव असल्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले होते. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा- राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले घुसखोरीचे आदेश? भारतीय सैन्याने डाव उधळला

चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होता. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 1, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या