मराठी बातम्या /बातम्या /india-china /

India-China Face off: लडाख सीमेवर तणाव संपवण्यासाठी चीनची 'ऑफर', पण भारत ठाम

India-China Face off: लडाख सीमेवर तणाव संपवण्यासाठी चीनची 'ऑफर', पण भारत ठाम

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या अशा हट्टामुळे भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या अशा हट्टामुळे भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या अशा हट्टामुळे भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : पूर्व लडाखमधील (East Ladakh) वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कर (Indian Army)तोपर्यंत तैनात आहे जोपर्यंत चीनी लष्कर त्यांच्या जागेवरून माघारी नाही होत. दोन्ही देशांमधील संबंध पुनर्संचयित करण्यासाठी चीनला 20 एप्रिलच्या आधीच्या परिस्थितीत जावं लागेल असं अनेकदा भारताकडून चीनला सांगण्यात आलं आहे. पण त्यावर चीनकडून कोणतीही पाऊलं उचलली गेली नाहीत. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या अशा हट्टामुळे भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम आहे. एका अहवालानुसार, 'चीनच्या सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीने या संपूर्ण घटनेला स्टारिंग मॅच बनवलं आहे. यावर भारताने हातवर हात ठेवून बसून राहवं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे भारतही अशी कठोर पावलं उचलण्याची तयारी करत आहे जेणेकरुन चीनला सीमा वादाचा परिणाम लक्षात येईल. राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू भारताकडून चीनला एक स्पष्ट संदेश दोन्ही बाजूंच्या लष्करी कमांडर्सच्या बैठकीत पीएलए भारतीय सैन्याला 'न्यू नॉर्मल' ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. या अहवालानुसार लष्कराचा एक सेनापती म्हणाला की, "आक्रमक आणि सीमेवर वाढता ताण असूनही पीएलएला भारतीय सैन्याकडून लष्करी बक्षीस हवं आहे." राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज भारताकडून चीनला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, जर ते पीएलए सीमेपासून दूर गेले नाही आणि 20 एप्रिलपूर्वी परिस्थिती पूर्वस्थितीत आणली नाही तर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, चीनला असं वाटतं आहे की, दबावाखाली येत भारत स्वतःहून गतिरोध संपवेल. त्यामुळे दोन्ही देश आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र आहे.
First published:

पुढील बातम्या