धक्कादायक: भारताला घेरण्याचा चीनचा डाव, 12 देशांमध्ये उभारतोय सैन्य तळ!

धक्कादायक: भारताला घेरण्याचा चीनचा डाव, 12 देशांमध्ये उभारतोय सैन्य तळ!

समुद्र मार्गावरही वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचंही अमेरिकेने म्हटलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन 2 सप्टेंबर: भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारताला घेरण्यासाठी आणि जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन भारता सभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनने यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. Military and Security Developments Involving the People's Republic of China (PRC) 2020' हा अहवाल पेंटागॉनने काँग्रेसला सादर केला आहे.

पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका या भारताला लागून असलेल्या देशांमध्ये चीनने लष्करी तळ बनवले आहेत. तर थायलँड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात, केनिया, सेशल्स, तंजानिया, अंगोला आणि तजाकिस्तानमध्ये लष्करी तळ बनविण्यासाठी चीन तयारी करत आहे.

भारतावर वचक ठेवण्याबरोबरच जगभर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी चीन हे तळ उभारत आहे. त्याचबरोबर समुद्र मार्गावरही वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचंही अमेरिकेने म्हटलं आहे.

India China : भारताने दिलं कडक उत्तर! 'चीननेच केली आगळीक म्हणून केली कारवाई'

एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्ट रोजी चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला.

जेव्हा दोन देशांमधील ब्रिगेड कमांडर्स चुसुल आणि मोल्दो इथे फ्लॅग बैठक सुरू असतानाच घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ही दोन्ही सैन्य टँक आणि इतर जड शस्त्रं घेऊन एकमेकांच्या समोर उभी आहेत. ताणतणाव कमी करण्यासाठी तासनतास चाललेल्या या बैठकीचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.

...तर 1962 पेक्षा भारताची अवस्था वाईट होईल, चिनी मीडियानं दिली धमकी

दरम्यान, मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. गॅलव्हान खोऱ्यानंतर लडाखमध्ये तणाव निर्माण झाला होता. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 2, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या