मराठी बातम्या /बातम्या /india-china /

चीनने भारताची जमीन बळकावली, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर खोटं बोलल्याचा पुन्हा आरोप

चीनने भारताची जमीन बळकावली, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर खोटं बोलल्याचा पुन्हा आरोप

'चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगावं, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. वस्तुस्थिती समोर आली पाहिजे.'

'चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगावं, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. वस्तुस्थिती समोर आली पाहिजे.'

'चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगावं, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. वस्तुस्थिती समोर आली पाहिजे.'

नवी दिल्ली 26 जून: भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर (India china border dispute) आरोप  -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगाव, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. सगळा देश सरकारसोबत आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सीमेवर असणाऱ्या सैनिकांना शस्त्र का दिली नाहीत याचं उत्तरही सरकारने दिलं पहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, लडाखच्या सीमेवर चीन छुप्या पद्धतीनं नवीन चाल खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही देशांमधील वाढत जाणारा तणाव कमी कऱण्यासाठी वारंवार बैठका होत असतानाच आता चीननं मंसूबे आखण्याची तयारीत आहे.

हेे वाचा - राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल

चीननं पुन्हा एकदा लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लडाखच्या डेपसांग भागात चीनचे सैनिक आणि वाहानं वाढवल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यातून सैन्य हटवण्याच्या झालेल्या निर्णयानंतर चीननं आता डेपसांगमध्ये सैन्य वाढवलं आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार 4 मे पासून चिनी सैन्य पूर्व लडाखच्या एलएसी प्रदेशात सैन्य क्षमता वाढवत होतं. तोफगोळे आणि शस्रास्त्रांसह 10 हजारहून अधिक सैनिक तैनात केले होते. पॅगोंग पासून गलवान खोऱ्यापर्यंत चीनच्या सैनिकांकडून अनेक हलचाली होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. भारत आणि चीनमधील सीमा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठकांमध्ये झालेला करार धुडकावून आपलं सैन्य वाढवत असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published:

Tags: India china border, Narendra modi, Rahul gandhi