चीनने भारताच्या सीमेवर तैनात केले 60 हजार सैनिक, अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

चीनने भारताच्या सीमेवर तैनात केले 60 हजार सैनिक, अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

‘क्वाड’ (Quad) समूहातले देश हे जगातले लोकशाहीवादी देश असून त्या सगळ्यांना कम्युनिस्ट चीन पासून धोका वाटतो आहे.'

  • Share this:

वॉशिंग्टन 10 ऑक्टोबर: भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांच्या राजकीय आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र तणाव कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. चीनने भारतासोबतच्या उत्तर सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य असलेल्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या बैठकीत सर्वच देशांचे परराष्ट्रमंत्री प्रत्यक्ष भेटले होते. त्या बैठकीवर चीनने टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना पॉम्पिओ यांनी चीनवर सडकून टीका केली. चीनचा व्यवहार हा बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

विस्तारवादी असलेल्या चीनने भारताच्या सीमेजवळ 60 हजार सैनिक तैनात केले असून त्यामुळे तणाव निवळणे कठिण असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘क्वाड’ (Quad) समूहातले देश हे जगातले लोकशाहीवादी देश असून त्या सगळ्यांना कम्युनिस्ट चीनपासून धोका वाटतो आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

चीन आणि पाकला धडा शिकवणार भारताची ‘K मिसाइल फॅमिली’, वाचा या मिसाइलची वैशिष्ट्ये

दरम्यान,  या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच एका परिषदेत सहभागी होणार आहेत. 17 नोव्हेंबरला BRICS राष्ट्रांची बैठक होणार असून त्यात सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच हे नेते आमने-सामने येणार असल्याने सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे.

चीन आणि पाकिस्तानला ‘राफेल’चा धाक, अमेरिकाही भारताच्या मदतीला येणार

भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती.

दरम्यान, भारत (India) आणि चीन (China)च्या सीमेवर अजुनही तणाव आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं स्पष्ट आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 'राफेल' या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने भारताची स्थिती मजबूत झाली आहे. याचा धसका पाकिस्तान आणि चीनने घेतल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे. या तणावात अमेरिकाही भारताच्या बाजूने असून आणीबाणीच्या प्रसंगात भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 10, 2020, 4:37 PM IST
Tags: chinaindia

ताज्या बातम्या