यंदाच्या दिवाळीत चीनचं निघालं दिवाळं! भारतीयांच्या एका निर्णयामुळे बसला 40 हजार कोटींचा फटका

यंदाच्या दिवाळीत चीनचं निघालं दिवाळं! भारतीयांच्या एका निर्णयामुळे बसला 40 हजार कोटींचा फटका

विशेषत: या दिवाळीत चीनला व्यावसायिक आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. दिवाळीच्या दिवशी लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : कोरोना संकटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल' (Vocal For Local) असे आवाहन केले आहे. विशेषत: दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींनी स्थानिक नागरिकांकडून वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. आता पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर लोकांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला. विशेषत: या दिवाळीत चीनला व्यावसायिक आघाडीवर मोठा धक्का बसला आहे.

दिवाळीच्या दिवशी लोकांनी चिनी वस्तूंवर जोरदार बहिष्कार घातला. व्यापार्‍यांची संघनटा असलेल्या कॅटच्या मते, दिवाळीत चीनला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. या उत्सवाच्या हंगामात लोक चिनी उत्पादनांकडे दुर्लक्ष करताना दिसले.

वाचा-जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारामध्ये भारत का नाही झाला सामील?

कॅटच्या नेतृत्वात देशभरातील व्यावसायिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भर भारत या आवाहनाची जोरदारपणे अंमलबजावणी केली. दिवाळीच्या दिवशी खरेदी-विक्रीसाठी लोकांनी चिनी उत्पादनास विरोध केला.

वाचा-India China Border : लडाख सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी No Man's Land महत्त्वाचा

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती दिली की, दिवाळीच्या काळात देशातील 20 वेगवेगळ्या शहरांमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सुमारे 72 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात चीनला सुमारे 40 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले.

वाचा- भारताचा दणका, चिनी सैन्याने मागे हटण्याची दाखवली तयारी; असा आहे फॉर्म्युला

कॅट या व्यवसाय संस्थेच्या म्हणण्यानुसार भारतात तयार केलेले एफएमसीजी उत्पादने, ग्राहक वस्तू, खेळणी, विद्युत उपकरणे व इतर वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, भेट वस्तू, मिठाई, स्नॅक्स, घरातील सामान, भांडी, सोनं व दागिने, शूज, घड्याळे, फर्निचर, कपडे, घराची सजावट मातीच्या दिव्यांसह दिवाळी पूजेच्या वस्तू, वस्तूंची विक्री चांगली झाली.

Published by: Priyanka Gawde
First published: November 17, 2020, 8:44 AM IST

ताज्या बातम्या