Home /News /india-china /

BIG NEWS: अखेर चीन नरमला, 6 महिन्यांपासूनची कोंडी फुटण्याची शक्यता

BIG NEWS: अखेर चीन नरमला, 6 महिन्यांपासूनची कोंडी फुटण्याची शक्यता

चर्चेत भारताला दमवायचं, दबाव टाकायचा, धमक्या द्यायच्या हे सगळे प्रकार चीनने करून पाहिले मात्र त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं दिसल्याने चीवरचा दबाव वाढला आहे.

    नवी दिल्ली 8 नोव्हेंबर: लडाखमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये (India China stand off) निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर झालेल्या चर्चेच्या आठव्या फेरीत चीनने नरमला असून दोन्ही देश कोंडी फुटण्याच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातल्या सूत्रांनी दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चुशूल इथं चर्चेची आठवी फेरी पार पडली. त्यात चीनने आडमुठी भूमिका सोडत तडजोड करण्याचे संकेत दिले आहेत. कुठल्या मुद्यावर नेमकी काय करायचं याचा अंतिम आराखडा आणि कृती योजना तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. चर्चेही आणखी एक फेरी होणयाची शक्यता असून त्यात कृती आराखड्याचा अंतिम रुप दिलं जाण्याची शक्यता आहे. सीमेवर तैनात केलेली शस्त्रास्त्र ही पुन्ही माघारी घेतली जाऊ शकतात. त्याचा तपशील ठरवला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत भारत अतिक्रमण सहन करणार नाही आणि माघारी पूर्वीच्या जागेवर गेल्याशीवाय तडजोड नाही अशी ठाम भूमिका भारताने घेतली होती. चर्चेत भारताला दमवायचं, दबाव टाकायचा, धमक्या द्यायच्या हे सगळे प्रकार चीनने करून पाहिले मात्र त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं दिसल्याने चीवरचा दबाव वाढला आहे. सीमेवर भारतासोबत युद्ध किंवा संघर्ष हा परवडणारा नाही याची चीनला जाणीव आहे. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चिनी लष्कराचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर दोन्ही देशांकडून सीमेवर मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: India china

    पुढील बातम्या