मोठी बातमी: चीनविरोधात LAC वर भारत आणखी 35000 जवान करणार तैनात

मोठी बातमी: चीनविरोधात LAC वर भारत आणखी 35000 जवान करणार तैनात

भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी आहे. चीनविरोधात भारताची तयारी सुरू असली तरी..

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : भारत-चीन सीमेवरील वादानंतर येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. इकडे भारताकडून चीनचे अॅप्लिकेशन बंद करण्यात आले आहे. सध्या भारत-चीन सीमेवरील तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सीमेवर आणखी 35000 जवान तैनात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

भारत-चीनदरम्यान 3488 किमी इतकी एलएसी आहे. या रेषा हलवण्याचे चीनचे मनसुबे असल्याने तणाव वाढला आहे. त्यामुळे भारताने सीमेवर अधिक सैन्य तैनात केले आहेत.

हे वाचा-चिनी कंपन्यांकडे शेवटचे 8 तास…अन्यथा भारतात कायमची बंदी

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती चिघळली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये सीमेवर तणावाची स्थिती आहे. आता यात आणखी भर पडल्याचं चित्र आहे. चीन सीमेवर आणखी 35 हजार जवान तैनात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थिती आता बदलली आहे. आणखी जवान रवाना झाले तरी परिस्थिती बदलण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी राजकीय नेतृत्वाकडून चर्चेची आवश्यकता असल्याचे दिल्लीतील संरक्षण विषयाचे तज्ज्ञ मेजर जनरल (निवृत्त) बी.के.शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

दोन्ही देशांच्या सैन्य वरिष्ठांच्या अनेक चर्चा झाल्या मात्र बहुतेक ठिकाणांहून चीनने जवानांना मागे हटविल्याचा दावा केला असला तरी तो खोटा असल्याचे सांगितले जात असून चीनने सैनिकांना हटवले नसल्याचं भारताचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.चीनविरोधात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात 5 राफेल विमानं दाखल झाली आहेत. सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी कऱण्यात आली.

हे वाचा-शौर्यचक्राने सन्मानित अधिकारी रचणार इतिहास; राफेलच्या कमांडिंग ऑफिसरला सॅल्यूट

त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. हवेतूनच जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधणार्‍या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 30, 2020, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading