नवी दिल्ली, 12 जानेवारी: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलिकडून सुरू असलेली घुसखोरी आणि वारंवार शस्रसंधीचं होणारं उल्लंघन तर लडाखमध्ये चीनच्या सुरू असलेल्या कुरघोडीविरोधात आर्मी चीफ नरवणे यांनी इशारा दिला आहे. पूर्व लडाख परिसरात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय सैन्यदल प्रमुख एम.एम. नरवणे यांनी चीन आणि पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. भारतीय जवान आपल्या सीमेवर अलर्ट आहेत. जवान प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. योग्य वेळी याचं उत्तर दिलं जाईल असं देखील नरवणे यांनी यावेळी सांगितलं.
A broad roadmap has been prepared to bring in all the new technologies to develop a technology-enabled army to meet challenges of future: Army Chief General Manoj Mukund Naravane pic.twitter.com/JDREgS02vW
Pakistan continues to embrace terrorism. We have zero-tolerance for terror. We reserve our right to respond at a time and place of our own choosing and with precision. This is a clear message we have sent across: Army Chief General Manoj Mukund Naravane pic.twitter.com/h913wxR80o
सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीला आणि कुरघोड्यांना चोख उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज आहे. सीमारेषेवर जवान अलर्ट मोडवर आहेत. चीन सोबत 8 वेळा चर्चा झाली मात्र त्यामधून कोणताही ठोस तोडगा निघत नाही. वारंवार चीनकडून नियमांचं उल्लंघन होत आहे. तर आम्ही पुढील चर्चेची वाट पाहात आहोत. कारवाईपेक्षा संवाद आणि चर्चेतूनच ठोस मार्ग निघेल अशी सकारात्मक भावना भारतीय सैन्यदल प्रमुख एम.एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय सैनिकांच्या निग्रहाबाबत मी समाधानी आहे. वेळ आली तर कोणतंही आव्हान परतवण्यास आपण सक्षम आहोत असा विश्वास CDS बिपीन रावत यांनी देखील अरुणाचल दौऱ्यादरम्यान व्यक्त केला होता.