मराठी बातम्या /बातम्या /india-china /

चीन सीमेजवळ लष्कराला रसदपुरवढा करणारा पूल कोसळला, VIDEO पाहून उडेल थरकाप

चीन सीमेजवळ लष्कराला रसदपुरवढा करणारा पूल कोसळला, VIDEO पाहून उडेल थरकाप

चीन सीमेवर तणाव असताना आणि लष्कराला तातडीची गरज असतानाही या पूलावरून जड वाहन गेले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चीन सीमेवर तणाव असताना आणि लष्कराला तातडीची गरज असतानाही या पूलावरून जड वाहन गेले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चीन सीमेवर तणाव असताना आणि लष्कराला तातडीची गरज असतानाही या पूलावरून जड वाहन गेले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली 21 जून: उत्तराखंड मधल्या पिथौरागड येथून चीन सीमेजवळ (india china border) जाणारा एका दरीतला पूल (Army bridge) कोसळला आहे. लष्करासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा पूल आहे. दोन टेकड्यांना जोडणार हा पूल होता. या पुलावरून एक मोठं वाहन गेल्याने हा पूल कोसळला आहे. या पूलावरून जड वाहनांना बंदी आहे असं असतानाही हे वाहन गेलेच कसे असा आता प्रश्न विचारला जात आहे. चीन सीमेवर तणाव असताना झालेला हा अपघात गंभीर समजला जातो. या भागात सीमा रस्ते बांधकाम संघटना (BRO) रस्त्याचं बांधकाम करत आहे. त्यासाठीच ही मशिन जात होती. मात्र त्याचं ओझं पेलवलं नसल्याने हा अपघात झाला आहे. याच पूलावरून सीमेवरच्या सैन्याला रसद पुरवढा केला जातो. हा पूल पुन्हा उभारण्यासाठी 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. चीनची नवी खेळी भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.  भारतीय औषध कंपन्या (Pharmaceutical products) त्यांच्या गरजेच्या 70 टक्के एपीआय चीनकडून आयात करतात. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर भारत दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, एपीआयसाठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताने चीनकडून सुमारे 17,400 कोटी (2.5 अब्ज डॉलर्स) एपीआय आयात केले होते. चीनकडून दुहेरी हल्ला वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी ईटीला सांगितले की, गलवान खोऱ्यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे. एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा चुकीचा फायदा उठवू लागला आहे. एपीआयच्या किंमती वाढल्याने औषधांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तिशाली तुकडी चीनला शिकवणार धडा पॅरासिटामॉलची किंमत 27 टक्के, ciprofloxacin ची किंमत 20 टक्के, पेन्सिलीन जीची किंमत 20 टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रॉडक्टच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. संपादन - अजय कौटिकवार
First published:

Tags: India china border, India-China

पुढील बातम्या