Home /News /heatlh /

Zydus Cadila: लहान मुलांच्या कोरोना लशीसंदर्भात मोदी सरकारने दिली महत्त्वाची बातमी!

Zydus Cadila: लहान मुलांच्या कोरोना लशीसंदर्भात मोदी सरकारने दिली महत्त्वाची बातमी!

देशात 18 वर्षांखालील (Below 18 years) नागरिकांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस (anti Covid vaccine) उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे.

    नवी दिल्ली, 16 जुलै : देशात 18 वर्षांखालील (Below 18 years) नागरिकांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस (anti Covid vaccine) उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे. सरकारच्या वतीनं दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. गुजरातमधील झायडस-कँडिला (Zydus Candila) या कंपनीची 12 ते 18 वयोगटासाठीची ही लस तयार असून औपचारिकता पूर्ण झाल्यावर लगेचच ती बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. औपचारिकता बाकी झायडस कँडिला लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच अधिकृत परवानगी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात 18 वर्षांखाली व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ही पहिली लस असेल, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. भारत बायोटेकची 2 ते 18 वर्षं वयोगटासाठी तयार करण्यात आलेली लसदेखील चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. 12 मे रोजी या लसीच्या चाचणीसाठी सरकारच्या वतीनं परवानगी देण्यात आली होती. ही लसदेखील काही आठवड्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. झायडसची चाचणी पूर्ण झायडस कँडिला लशीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर या लशीचे प्रयोग करण्यात आले आहेत आणि यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या शरीरात अँटिबॉडिज निर्माण व्हायला मदत होत असल्याचं दिसून आलं आहे. या लशीला मंजुरी मिळाली, तर देशात लसपुरवठा करणारी झायडस ही पाचवी कंपनी करणार आहे. यापूर्वी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक-व्ही आणि अमेरिकेतील मॉर्डना लशीला मंजुरी देण्यात आली आहे. हे वाचा - Corona Alert : लस घेऊनही कोरोना झालेल्या 80 टक्के नागरिकांमध्ये डेल्टा व्हायरस लस बाजारात कधी येणार? लशीला वापराची परवानगी मिळण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लगेचच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. पुढच्या एक ते दीड महिन्यात ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात ही लस मिळायला सुरुवात होईल, असं सांगण्यात येत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या