तुमची मुलं वारंवार चिडचिड करतात? मग करा हे उपाय

तुमची मुलं वारंवार चिडचिड करतात? मग करा हे उपाय

एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा धक्का बसला तर लहान मुलं आक्रमक होण्याची शक्यता असते. अशी मुलं प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा, चिडचिड करू लागतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आपल्याला कशामुळे काय होतं हे ज्याप्रमाणे मोठ्या माणसांना व्यक्त करता येतं, तसं लहान मुलांना सांगता येत नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये (Children) कोणत्याही शारीरिक, मानसिक त्रासाचं पर्यवसान अनेकदा चिडचिडेपणात होतं. लहान मुलांमधला चिडचिडेपणा हा काही वेळा तात्कालिक असतो, तर काही वेळा ही समस्या दीर्घकालीनही (Long term) असू शकते. परंतु, लहान मुलांमधला हा चिडचिडेपणा (Irritability) अगदी स्वाभाविक म्हणता येईल. या चिडचिडेपणाचं रूपांतर आक्रमकपणात (Aggressive) होऊ लागलं, तर ही बाब गंभीर ठरू शकते.

मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूच्या वातावरणामुळे लहान मुलांमध्ये अशी वृत्ती तयार होते. लहान मुलांमधला चिडचिडेपणा आणि आक्रमकपणा कमी होण्यासाठी काही उपाय निश्चित आहेत. याबाबतची माहिती `टाइम्स नाऊ`ने दिली आहे.

लहान मुलं सातत्यानं चिडणं किंवा आक्रमक होणं हे त्यांच्या आरोग्यासाठी (Health) निश्चितच चांगलं नसतं. कोणत्याही लहान मुलाचा स्वभाव असा होणं हे मानसिक विकाराचं (Psychological Disease) लक्षण असतं. तुमचं लहान मूल सातत्यानं चिडत असेल किंवा प्रसंगी आक्रमक होत असेल, तर त्यामागची कारणं शोधणं आवश्यक आहे. ही कारणं तुम्हाला सापडली, तर लहान मुलांमधला चिडचिडेपणा, आक्रमकपणा तुम्ही नक्कीच कमी करू शकाल.

तोंडाची दुर्गंधी हे आरोग्याच्या असंतुलनाचं लक्षण; अशी काळजी घ्या आणि रहा फ्रेश

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, एडीएचडी, ऑटिझम, ओसीडी आदी मानसिक आजार असल्यास अशी लहान मुलं आक्रमक झाल्याचं दिसून येतं. अशा स्थितीत त्यांची मागणी पूर्ण करण्याऐवजी त्यांना शांत करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. या मुलांसमोर आई-वडिलांनी कलह टाळावा. एक चांगले पालक बनण्याचा प्रयत्न करावा. अशा मुलांना सातत्यानं चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. यामुळे लहान मुलांची वागणूक आणि व्यवहार निश्चितच बदलू शकतो.

एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा धक्का बसला तर लहान मुलं आक्रमक होण्याची शक्यता असते. अशी मुलं प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा, चिडचिड करू लागतात. अशा वेळी तुम्ही मुलांना चांगल्या वातावरणात ठेवलं तर त्यांच्या मानसिकतेत निश्चित परिवर्तन होऊ शकतं.

Health Tips : व्यायाम करताना जास्त घाम निघणं ठरू शकतं धोकादायक; काय घ्यायची काळजी?

आजकालचे पालक आपल्या मुलांप्रति अवाजावी अपेक्षा ठेवतात. जी कामं मुलांना बिल्कुल आवडत नाहीत, त्यात त्यांना आनंद मिळत नाही, अशी कामं त्यांना करायला लावण्यावर पालकांचा भर असतो. त्यामुळे मुलांमध्ये नैराश्येची भावना तयार होते, त्यांची मानसिक घुसमट होते आणि त्यांचं वर्तन आक्रमक होतं.

निराशा कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीसाठी घातक असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे मूडशी (Mood) संबंधित विकार बळावतात. सातत्यानं मूड बदलणं ही समस्या लहान मुलांमध्ये दिसून येते.

त्यामुळे लहान मुलांमधला चिडचिडेपणा किंवा आक्रमकपणा कमी होण्यासाठी पालकांनी त्यांना योग्य वातावरण देणं आणि त्यांच्या मानसिकतेचा विचार करून वर्तणूक करणं आवश्यक आहे.

First published: September 17, 2021, 4:43 PM IST

ताज्या बातम्या