मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

ऐन तारुण्यात कॅन्सरनं गाठलं; 7 वर्षे लढा देऊन पुणेकर तरुणी बनली यशस्वी बिझनेसवुमन

ऐन तारुण्यात कॅन्सरनं गाठलं; 7 वर्षे लढा देऊन पुणेकर तरुणी बनली यशस्वी बिझनेसवुमन

स्तनपान बंद झाल्यानंतर महिलांना स्तनांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात. स्तन लटकणं, कडक होणं,जड होणं, ताप येणं, निपलमधून दूध पाझरणे अशा समस्या यायला लागतात

स्तनपान बंद झाल्यानंतर महिलांना स्तनांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात. स्तन लटकणं, कडक होणं,जड होणं, ताप येणं, निपलमधून दूध पाझरणे अशा समस्या यायला लागतात

कॅन्सरमुळे (cancer) मी खूप काही शिकले आणि त्याचा फायदा मला माझ्या व्यवसायातही झाला, असं ही कॅन्सरवर मात करणारी पुणेकर तरुणी (pune girl battle with cancer) सांगते.

    पुणे, 01 मार्च :  शिल्पा दरे (नाव बदललेलं)... तारुण्यात कुठे प्रवेश करत होती. कॉलेज शिकून करिअर करण्याची स्वप्नं पाहत होती. अनेक स्वप्नं उराशी बाळगून ती बारावीचा झटून अभ्यास करत होती. तिच्या या वयाच्या महत्त्वाच्या अशा टप्प्यात तिला गाठलं ते महाभयंकर आजारानं. शिल्पाला कॅन्सर (Cancer) झाला... ब्रेस्ट कॅन्सर (breast cancer)... जो शब्द जरी ऐकला तरी पायाखालची जमीन सरकते. त्यातही शिल्पाला ऐन तारुण्यात या आजारानं ग्रासलं. तिच्या जागी दुसरं कुणीही असतं तर कोलमडून पडलं असतं. पण शिल्पा खचली नाही. तिनं कॅन्सरचा जिद्दीनं सामना केला, त्यावर मात केली. इतकंच नव्हे तर तिनं स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे. शिल्पा 18 वर्षांची होती. तेव्हा ती बारावीत शिकत होती. तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. कॅन्सर झाल्याचं म्हटल्यावर शिल्पाला तसा धक्का बसलाच पण तिच्यापेक्षा इतरांनी तिच्याबाबत जास्त चिंता व्यक्त केली. पण शिल्पा खचली नाही तिनं जिद्दीनं कॅन्सरला तोंड द्यायचा निर्धार केला. शिल्पा म्हणाली, "जेव्हा मला कॅन्सर असल्याचं निदान झालं तेव्हा अनेक जण मला म्हणाले की मी जास्त वर्षे जगणार नाही. पण मला लढा न देताच हार मानायची नव्हती. मी उपचार घ्यायचे ठरवले आणि माझं शिक्षणही पूर्ण करण्याचं ठरवलं. तरुण वयात कॅन्सरशी लढा देणं खूप कठीण आहे. पण मी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. उपचार घेत असताना मी माझे वाढदिवस साजरे केले, रुग्णालयात परीक्षेचा अभ्यासही केला" पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिच्यावर उपचार झाले. सर्जरी करून तिच्या ब्रेस्टमधील ट्यूमर काढून टाकण्यात आला. पुढील दोन वर्षे तिनं 30 पेक्षा जास्त केमोथेरेपी आणि काही  रेडिएशन थेरेपी घेतल्या. आता शिल्पा 25 वर्षांची आहे. तिनं कॅन्सरविरोधातील लढा जिंकला आहे. तब्बल 7 वर्षे लढा देऊन कॅन्सरवर तिनं यशस्वीरित्या मात केली आहे. इतकंच नव्हे तर तिनं स्वत:चा लॉजिस्टिकचा बिझनेस सुरू केला. जो उत्तम सुरू आहे. शिल्पाला बेस्ट यंग बिझनेसवुमेन म्हणून अनेक संस्थांकडून तिला पुरस्कारही मिळाले आहेत. हे वाचा - Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर शिल्पा म्हणाली, "डॉक्टर जे काही सांगायचे मी ते सर्व करायचे. मी आता माझी जीवनशैली बदलली आहे. मी घरात बनवलेलं ताजे पदार्थ खाते, दररोज व्यायाम करते. केमोथेरेपीमुळे माझं वजन वाढण्याची शक्यता होती. पण माझ्या निरोगी जीवनशैलीमुळे माझं वजन वाढलं नाही. मी दररोज अगदी दहा तासही काम करते. कॅन्सरमुळे मी खूप काही शिकले. कॅन्सरशी लढण्यासाठी लढाऊ वृत्ती, संयम आणि चिकाटी हवी. या सर्वाचा उपयोग मला माझ्या व्यवसायातही झाला. आज माझ्याकडे 20 लोकांची टीम काम करते. मी जेव्हा लोकांना सांगते की मी कॅन्सरग्रस्त होते, तेव्हा लोकांना माझ्याकडे पाहून आश्चर्यच वाटतं" "आता मला एका चांगल्या जोडीदाराची प्रतीक्षा आहे. कॅन्सरबाबत समाजात अनेक गैरसमज आहे. एकदा का कॅन्सर झाला की तुम्ही जास्त वर्षे जगू शकत नाही, असंच लोकांना वाटतं. पण हे खरं नाही. कॅन्सर झाल्यानंतरदेखील तुम्ही निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकता", असं ती म्हणाली. हे वाचा - Pregnancy च्या सुरुवातीला फक्त पाळी चुकणंच नव्हे तर हीसुद्धा दिसू शकतात लक्षणं रुबी हॉल क्लिनिकमधील डॉ. मिनीष जैन यांनी सांगितलं, "भारतात तरुण वयातच कॅन्सर होण्याची प्रकरणं वाढत आहेत. शिल्पाला खूपच तरुण वयात कॅन्सर झाला. तिच्या फक्त उपचार झाले नाही तर ती आता कॅन्सरमुक्तही झाली आहे. उपचार तर महत्त्वाचे आहेतच पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचंही पालन करायला हवं. उपचार घेता घेता शिल्पाने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ती तिचा व्यवसाय उत्तमरित्या करते आहे. कॅन्सरला घाबरून जाऊ नका. तुम्ही योग्य उपचार घेतले तर निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकता, हेच शिल्पानं दाखवून दिलं आहे"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Breast cancer, Cancer, Health, Pune

    पुढील बातम्या