Home /News /heatlh /

Orange Benefits in Winter: थंडीच्या दिवसांत संत्री खाल्ल्यास मिळतात ‘हे’ अफलातून फायदे

Orange Benefits in Winter: थंडीच्या दिवसांत संत्री खाल्ल्यास मिळतात ‘हे’ अफलातून फायदे

Orange Benefits in Winter: संत्र्यामध्ये आढळणारं अँटी-ऑक्सिडंट्स आणि दुसऱ्या पोषक-तत्त्वांमुळे याचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचं असल्याचं दिसून आलं आहे.

    नवी दिल्ली, 18 जानेवारी : थंडीच्या दिवसात (Winter) येणारी मौसमी फळ सेवन करणं आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं. कारण या फळांमध्ये भरपूर पोषक तत्त्व आढळतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स किंवा फायटोन्यूट्रिएंट्सचं भंडार जणू या फळांमध्ये (Fruits) असतं. दुसरीकडे जास्तकरून या फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाणही कमी असून फायबरची मात्रा भरपूर असते. ज्यामुळे या फळाचं सेवन केल्यास हृदयरोग आणि रक्तदाब किंवा डायबिटीससारख्या परिस्थितीत खूप फायद्याचं ठरतं. व्हिटॅमीन सी युक्त असंच एक फळं आहे संत्र (Orange). जे थंडीच्या दिवसात अगदी सहज मिळतं. व्हिटॅमीन सी चा एक उत्तम स्त्रोत असण्यासोबतच संत्र्यात फायबरची मात्रा ही चांगल्या प्रमाणत असते आणि मिनरल्स व अन्य पोषक-तत्त्वही मिळतात. संत्र्यामध्ये आढळणारं अँटी-ऑक्सिडंट्स आणि दुसऱ्या पोषक-तत्त्वांमुळे याचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचं असल्याचं दिसून आलं आहे. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला अनेक संक्रमित रोगांशी लढण्यास मदत तर करतेच. सोबतच अनेक रोगांवर उपचार म्हणूनही लागू पडते. चला जाणून घेऊया हिवाळ्याच्या मौसमात संत्री खाण्याच्या फायद्यांबद्दल. वाचा : मटारच-मटार.. खा वर्षभर! या 2 सोप्या पद्धतींनी घरच्या-घरी करू शकाल दीर्घकाळ स्टोअर वजन कमी करण्यास मदत संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन-सी शिवाय फायबरची (Fiber) मात्राही भरपूर प्रमाणात आढळते. ही दोन्ही तत्त्वं वेट-लॉस म्हणजेच वजन कमी करण्यास (Weight Loss) मदतनीस ठरतात. संत्र्यांमध्ये फायबर असल्यामुळे हे खाल्ल्याने तुम्हाला भूक कमी लागते. तर संत्र्यांमुळे आपल्याला कॅलरीजसुद्धा (Calories) फार कमी मिळतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी संत्र खाणं हा योग्य पर्याय ठरू शकतो. त्वचेसाठी आहे फायदेशीर त्वचेसाठी संत्र एखाद्या औषधांपेक्षा कमी नाही. संत्र खाल्ल्याने मिळणाऱ्या फायद्यांसोबतच याचा त्वचेसाठीही थेट वापर करता येतो. संत्र्यातील व्हिटॅमिन-सी सोबतच व्हिटॅमिन-ए आणि ई सुद्धा आढळतं. ही तिन्ही तत्त्वं त्वचेला तारूण्य आणि सुंदर बनवण्यात (Beautiful Skin) महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. व्हिटॅमिन-सी त्वचेच्या थरांमध्ये कॉलेजनची निर्मिती करतात. ज्यामुळे आपली त्वचा तारूण्यपूर्ण दिसते. यामुळे त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने संत्र जणू वरदानच आहे. वाचा : Water bottle धुताय पण ती खरंच स्वच्छ होतेय का? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती दात आणि हाडांना देतं बळकटी संत्र दात आणि हाडांसाठीही फायदेशीर आहे. कारण यामध्ये कॅल्शियमही आढळतं. जे दातांना आणि हाडांना मजबूत बनवतं. यामध्ये आढळणारं व्हिटॅमिन-सी दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे या मौसमात येणं संत्र नक्की खाल्लं पाहिजे. सर्दी-पडसंसारख्या समस्या करतं दूर संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि दुसरी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात. जी आपल्या इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत करण्यांमध्ये मुख्य भूमिका निभावतात. जर तुमची इम्यूनिटी उत्तम असेल तर सर्दी-पडसं किंवा खोकल्यांसारख्या अनेक समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत. त्यामुळे संक्रमणामुळे होणाऱ्या या समस्यांपासून संरक्षणासाठी संत्र्यांचं नियमित सेवन करणं उपयोगाचं ठरतं. वाचा : सकाळी उठताच जोडीदारासोबत फक्त करा हे काम; संपूर्ण दिवस उत्तम जाईल इम्युनिटी वाढवतं संत्र्यांमध्ये आढळणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जसं व्हिटॅमीन-सी आणि ए व पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शियम सारखी पोषक तत्त्व आपली इम्युनिटी मजबूत करतात. संत्र्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायट्रोन्यूट्रिएंट्सही आढळतात जे आपल्या रोग-प्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्यून-सिस्टमला मजबूत करतात. यामुळे खासकरून थंडीच्या दिवसात सर्दी, फ्लू सारख्या आजारांना टाळण्यासाठी संत्र्याचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Winter

    पुढील बातम्या