Home /News /heatlh /

कोरोना लशीचा दुसरा डोस आता तुमच्या हातात; लसीकरणाच्या नियमात मोठा बदल

कोरोना लशीचा दुसरा डोस आता तुमच्या हातात; लसीकरणाच्या नियमात मोठा बदल

कोरोना लशीचा दुसरा डोस (corona vaccine second dose) 4 ऐवजी 6 ते 8 आठवड्यांनंतर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या कालावधीत दुसरा डोस कधी घ्यायचा हे तुम्हालाच ठरवता येईल.

    मुंबई, 23 मार्च : देशभरात सध्या कोरोना लसीकरण (Corona vaccination) वेगाने सुरू आहे. याचदरम्यान केंद्र सरकार लसीकरणाच्या नियमात काही ना काही बदल करताना दिसत आहे. कोरोना लशीचा दुसरा डोस (corona vaccine second dose) 4 ऐवजी 6 ते 8 आठवड्यांनंतर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या कालावधीत दुसरा डोस कधी घ्यायचा हे तुम्हालाच ठरवता येईल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोरोनाचा दुसरा डोस घेऊ शकतील. CoWIN च्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. इथंच कोरोना लशीसाठी नोंदणी केली जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना लशीचा तारीख समजते आणि त्यानंतर त्या व्यक्तीला दुसरा डोस कधी मिळेल याचीदेखील तारीख मिळते. आतापर्यंत 4 आठवडे म्हणजे 28 दिवसांनी कोरोना लशीचा दुसरा डोस दिला जात होता. पण सरकारने नुकताच हा कालावधी वाढवला आहे. केंद्राच्या नव्या गाइडलाइन्सनुसार कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये आता 4 च्या ऐवजी 6 ते 8 आठवड्यांचं अंतर असेल.  शिवाय आता कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर4 ते 8 आठवड्यांच्या कालावधीत तुम्ही कधीही कोरोनाचा दुसरा डोस घेऊ शकता. हे वाचा - Covid-19 शी लढण्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन; राज्यांना दिले 3 महत्त्वाचे आदेश मीडिया रिपोर्ट्सनुसार लशीबाबत तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनुसार नॅशनल टेक्निकल एडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायजेशन (NTAGI) आणि लसीकरणाच्या तज्ज्ञ टीमच्या नव्या संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्देशांवर राज्य सरकारला अंमलबजावणी करावी लागेल. असा दावा केला जात आहे की, जर लशीचा दुसरा डोज 4 ऐवजी 6 वा 8 आठवड्यांमध्ये देण्यात आला तर जास्त प्रभावी असल्याचं दिसून येतं. या बाबात अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. हे वाचा - मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार कोरोना लस देशात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात 2 प्रकारच्या लशीचा वापर केला जात आहे. पहिली लस देशातील कंपनी भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ऑफ इंडियाची (Covishield) कोविशिल्ड. यापैकी कोविशिल्डबाबत केंद्र सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत.  दरम्यान  कोवॅक्सिनवर केंद्राचे हे निर्देश लागू नसतील. म्हणजेच ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोज 4 आठवड्यांनंतरही दिला जाईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या