Home /News /heatlh /

Immunity वाढवण्यासाठी करा योग; ही आसनं रक्तदाबातही फायदेशीर, पाहा VIDEO

Immunity वाढवण्यासाठी करा योग; ही आसनं रक्तदाबातही फायदेशीर, पाहा VIDEO

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

रोगप्रतिकार शक्ती (Immunity)वाढविण्यासाठी नियमितपणे योगासने केल्यास शरीराला एनर्जी मिळते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते. सध्याच्या काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी (Strong Immunity) नियमितपणे योगा करा.

    दिल्ली,17 मे : योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात योगामुळे एनर्जी वाढते . योगा (Yoga)मुळे शरीराच्या व्याधी कमी होतात(Reduced Disorders of the body). तसेच मानसिक आरोग्य चांगलं राहतं. योगासनांमुळे ब्लड सर्क्युलेशन(Blood Circulation) सुधारतं, पचनक्रिया सुधारते(Improves Digestion). आजकालच्या जीवनशैलीने राग आणि चिडचिडेपणा वाढतो आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासनं महत्वाची भूमिका बजावतात. ('मोदीजी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यो भेजी?' प्रियांका गांधींची नवी मोहीम) पस्चिमोत्थासन: पस्चिमोत्थासन या योगात पश्चिम आणि उत्तान अशी दोन नावं समाविष्ट आहेत. पश्चिम म्हणजे पश्चिम दिशा म्हणजेच शारीराचा मागचा भाग आणि उत्तान म्हणजे खेचलेलं. ज्यांना मणक्याचे विकार आहेत त्यांनी पश्चिमोत्तानासन करावं. हे आसन करताना शरीराच्या मागच्या भागात म्हणजेच मणक्यावर ताण येतो, म्हणून या आसनाला पस्चिमोत्थासन म्हणतात. हे आसन केल्याने शरीराचा संपूर्ण भाग ताणला जातो आणि हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पास्चिमोत्थानसन हा रामबाण उपाय म्हणून ठरतं आणि या आजाराची लक्षणं दूर करण्यास मदत करतं. याशिवाय हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure)साठीही  फायदेशीर आहे. (हृदयद्रावक! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू)  पूर्ण मुद्रा: सरळ उभे रहा, श्वास घेत दोन्ही हात वरच्या बाजुला न्या आणि श्वास सोडत खाली या . ही क्रिया पुन्हापुन्हा करा. भ्रामरी प्राणायामः भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी जमिनीवर बसा. यानंतर,दोन्ही हातांचे कोपरे दुमडत कानाजवळ न्या आणि अंगठ्यांच्या मदतीने कान बंद करा. कान बंद केल्यावर संपूर्ण चेहरा बोटांनीझाका. यानंतर,तोंड बंद करा आणि नाकातून हलका श्वासोच्छवास घ्या. 15 सेकंद हे आसन केल्यावर पुन्हा नॉर्मल स्थितीत या. (बापाचा खांदाच झाला लेकीची तिरडी; कोरोना अजून किती अंत पाहणार? भयावह VIDEO) अशा प्रकारे 10 ते 20 वेळा ही प्राणायामाची प्रक्रीया करा. भ्रामरी प्राणायामाची ही प्रक्रीया सुरवातीला 5 ते 10 वेळा करा. त्यानंतर प्रमाण वाढवा. हा प्राणायाम शांत वातावरणात करावा. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Yoga

    पुढील बातम्या