मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

World Rabies Day 2022: आज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार

World Rabies Day 2022: आज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार

World Rabies Day Significance: यावर्षी 16 वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम ‘रेबीज: वन हेल्‍थ, जीरो डेथ्‍स’ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 सप्टेंबर : रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी 1885 मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी 16 वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम ‘रेबीज: वन हेल्‍थ, जीरो डेथ्‍स’ आहे. ही थीम मानव आणि प्राणी यांच्यातील संबंध वृंद्धीगत करणारी आहे.

रेबीज रोगाचा प्रसार कुत्रा चावल्याने होतो -

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लसा विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे रेबीजचा संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक झुनोटिक रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे आणि माकडांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूला सूज देखील येऊ शकते. असे मानले जाते की 99 टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो, त्यामुळे रेबीजमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

रेबीज डेचा इतिहास काय?

जागतिक रेबीज दिन 28 सप्टेंबर 2007 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात WHO, अमेरिका आणि अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांना रेबीजचे धोके आणि लसीचे फायदे याबद्दल जागरुक करणे हा होता.

हे वाचा - 'या'आजारामुळे गणितात कमकुवत असतात मुलं, याचं कारण आणि उपचार जाणून घ्या

हळूहळू या संस्थांनी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले आणि लोकांना त्यांच्याशी जोडण्याचे काम केले. तेव्हापासून दरवर्षी 28 सप्टेंबरला रेबीज दिन साजरा केला जाऊ लागला. जागतिक रेबीज दिनानिमित्त जागतिक आरोग्य संस्था या आजाराचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी विविध मार्गांबद्दल जनजागृती करत आहेत.

First published:

Tags: Dog, Health