Home /News /heatlh /

World Hypertension Day: ब्लड प्रेशरचा त्रास आहे कसं ओळखायचं? कधीच होऊ नये म्हणून काय करायचं?

World Hypertension Day: ब्लड प्रेशरचा त्रास आहे कसं ओळखायचं? कधीच होऊ नये म्हणून काय करायचं?

प्राध्यापक माजिद सांगतात या आजारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. कारण, योग्य उपचारांनी हायपरटेन्शनचा धोका कमी करता येतो.

प्राध्यापक माजिद सांगतात या आजारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. कारण, योग्य उपचारांनी हायपरटेन्शनचा धोका कमी करता येतो.

Hypertension मुळे काही गंभीर स्वरुपाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच ओळखा याची लक्षणं आणि फक्त 3 गोष्टी पाळा कधीच होणार नाही त्रास

    दिल्ली, 17 मे :  वाढत्या वयानुसार आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे होणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे हायपरटेन्शन (Hypertension) हा त्रास. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. Hypertension या आजारात  सुरवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. पण, अनेक जण हिच चुक करतात. हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर (Blood Pressure) या आजारामुळे हेल्थ कॉम्पिलीकेशन्स  (Health Complications) निर्माण होतात. या एका आजारामुळे यामुळे हार्ट अटॅक,स्ट्रोक, डायमेन्शिया, क्रोनिक किडनी डिसीज आणि वेट लॉस सारखे त्रास होऊ शकतात. 17 मे या दिवशी वर्ल्ड हायपरटेन्शन दिवस (World Hypertension Day,) साजरा केला जातो. वर्ल्ड हाइपरटेन्शन लीगकडून (WHL) दरवर्षी हायपरटेन्शन बद्दल जागृती निर्माण करण्यसाठी हा दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड हाइपरटेन्शन लीगकडून 85 राष्ट्रांमध्ये हा दिवस साजरा होतो. हाइपरटेन्शन हा एक सायलेंट किलर आहे. त्यामुळेच त्याची लक्षणं आणि काळजी याची माहिती असायला हवी. (आई-वडिलांच्या कोरोना इलाजासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वाला गुट्टाने केली मदत) वर्ल्ड हाइपरटेन्शन डे 17  मेला जगभरात हा दिवस साजरा होतो. आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल रहावं यासाठी काय करावं? काय करु नये ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. जगात लाखोंच्या संख्यने याचे रुग्ण आढळतात. शिवाय हा आजार अनेक आजारांना बरोबर घेऊन येतो. वर्ल्ड हाइपरटेन्शन डे 2005 साली पहिल्यांदा 14 मेला जगभरात साजरा करण्यात आला होता. पण, पुढच्या वर्षी म्हणजे 2006 पासून 17 मेला हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. याच्या माध्यमातून लोकांच्या मनात हाइपरटेन्शन बद्दल जागृकता निर्माण केली जाते. (Cyclone Tauktae डोंबिवली : ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने आग, रेल्वे खोळंबल्या) आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब सामान्यपणे 110 ते 150 मिमी एचजी असावा आणि डायस्टोलिक दाब 90 मिमी एचजीपेक्षा कमी असावा. उच्च रक्तदाब झालेल्या व्यक्तींची रक्तदाबाची पातळी वाढलेली असते. हायपरटेन्शनची लक्षणं छातीत दुखणं, अंधुक दिसणं, श्वासोच्छवासाला त्रास, थकवा, उलटी येणे किंवा नाकामधून रक्त येणं. ही हायपर टेन्शनची लक्षणं आहेत. कशी काळजी घ्यावी आहार पोषक आहार घ्यायला हवा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, कोशिंबीरी, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, या कच्च्या भाज्या आणि ताजी फळं खावीत. जेवणाच्या ताटात एक्सट्रा मीठ घेऊन खाण्याची सवय बंद करा. बर्‍याच लोकांना त्यांच्या अन्नात अतिरिक्त मीठ घालण्याची सवय असते. (मुंबईत पावसाचा जोर वाढला; मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; पाहा VIDEO) तळलेले खाद्यपदार्थ खांणं टाळावं त्यामुळे रक्तातला कोलस्ट्रॉल वाढतो. चपात्यांना तेल किंवा जास्त तूप लावू नये. केक, आईस्क्रीम, चॉकलेट, मिठाई यात जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. लोणी, चीज, ड्रायफ्रूट्स, मद्य, मसालेदार पदार्थ, मांस आणि मसालेदार अन्न पदार्थ खाऊ नयेत. हिरव्या भाज्या, ब्लूबेरी, बीट,स्किम मिल्क, ताक आणि दही ओट, केळी,टोमॅट, गहू,ज्वारी, बजरी,हिरवे वाटाणे, आवळे, पपई यांचा आहारात समावेश करावा. टेन्शन टेन्शन पासून दूर रहा. मानसिक ताण, राग कमी करण्यासाठी व्यायामाची मदत घ्या. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन गुंतवा, स्वत: ला एखाद्या कामात व्यस्त ठेवा. चांगली पुस्तकं वाचा. स्वत: ला व्यस्त ठेवल्याने मनावरचा ताण कमी होऊ शकतो. जास्त ताण आल्याने हायपर टेन्शनचा त्रास होऊ शकतो. (सुपरस्टार रजनीकांत यांचे कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठे योगदान, पाहा VIDEO) व्यायाम व्यायामाने (Exercise) हायपरटेन्शमध्ये फायदा होऊ शकतो. दररोज चालणं, धावणं, सायकलिंग, योगा करावा. प्राणायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. वजन वाढलं असेल तर कमी करा. रात्री झोपेच्या गोळ्या न घेता. पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा. कोणतंही व्यसन असेल तर बंद करा. घरातील वातावरण चांगलं ठेवा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Heart risk, Lifestyle

    पुढील बातम्या