मराठी बातम्या /बातम्या /heatlh /World Heart Day 2021: तरुणींमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? वाचा 7 कारणं

World Heart Day 2021: तरुणींमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? वाचा 7 कारणं

Heart attack

Heart attack

आता तरुणी आणि महिलांमध्येही हृदयरोगाचा (Heart Attack in Young Women) धोका वाढत चालला आहे. कमी वयातच महिलांना हृदयविकार होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात

  नवी दिल्ली 29 सप्टेंबर : हृदय (Heart) हे आपल्या शरीराचं इंजिन आहे. या इंजिनाचं वैशिष्ट्य असं आहे, की ते कधीच विश्रांती घेत नाही. त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने काळजी (Heart Care) घेण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही. याबद्दल जनजागृती (Awareness) करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन अर्थात World Heart Day साजरा केला जातो. आजच्या काळातली आपली जीवनशैली अशी विचित्र आहे, की भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुणांना हृदयरोगाचा असलेला धोका झपाट्याने वाढतो आहे. आपल्या आजूबाजूलाही आपण अशी अनेक उदाहरणं ऐकतो, वाचतो, पाहतो की अगदी ऐन तिशी-चाळिशीतल्या व्यक्तींचाही हार्ट अॅटॅकमुळे अचानक मृत्यू होतो. त्यातच आता तरुणी आणि महिलांमध्येही हृदयरोगाचा (Heart Attack in Young Women) धोका वाढत चालला आहे. कमी वयातच महिलांना हृदयविकार होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'एनडीटीव्ही'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  पूर्वी व्यसनाधीन महिलांचं प्रमाण खूप कमी होतं. आताच्या काळात मात्र अनेक तरुण महिलांना सिगारेट (Cigarettes) किंवा दारूचं व्यसन (Alcoholism) असल्याचं पाहायला मिळतं. जास्त प्रमाणात मद्यपान करणं, तसंच सिगारेट्स ओढणं हे तरुण वयातच महिलांमध्ये हृदयविकार होण्यास, हार्ट अटॅक येण्यास आमंत्रण देण्यासारखं आहे.

  कॅन्सरपासून कित्येक आजारांवर गुणकारी आहेत अंबाडीच्या बिया; इतके सारे आहेत फायदे

  तरुणींना हार्ट अटॅक येण्याचं प्रमुख कारण लठ्ठपणा (Fatness) हेदेखील आहे. डॉक्टर्स वारंवार सांगतात, की लठ्ठ व्यक्तींमध्ये दृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. कारण लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यातून हृदयविकार जडू शकतो. त्यामुळे महिलांनी लठ्ठपणा नियंत्रित होण्यासाठी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे.

  पुरेशी (Incomplete Sleep) झोप न घेणं हेदेखील हृदयविकाराचं कारण ठरू शकतं. कारण झोप पुरेशी झाली नाही, तर रक्तदाबावर वाईट परिणाम होतो. रक्तदाबात बिघाड झाला, तर हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी किमान सात ते आठ तास झोप नियमितपणे घेणं गरजेचं आहे.

  मधुमेह अर्थात डायबेटीस (Diabetes) हेदेखील हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. डायबेटीसमुळे किडनीसोबतच हृदयावरही विपरीत परिणाम होतो. गेल्या दशकापासून मधुमेहग्रस्त महिलांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेल्याचं डॉक्टर्स सांगतात. मधुमेहामुळे मेटाबॉलिक अॅबनॉरमॅलिटीज होतात आणि त्यामुळे तरुण महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.

  जास्त घाम येतो, पायांवर सूज आहे? दुर्लक्ष नको, असू शकतात Heart Attack ची लक्षणं

  ताण अर्थात स्ट्रेस (Stress) हे हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. आजच्या काळात महिलांचं अस्तित्व केवळ चूल आणि मूल एवढंच मर्यादित राहिलेलं नाही. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात. त्यामुळेच त्यांनाही प्रचंड ताण सहन करावा लागतो. ताणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि त्यातून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळेच तणावरहित राहण्याचा किंवा ताण हलका करण्याचा प्रयत्न महिलांनी कायम करावा, असा सल्ला दिला जातो.

  गर्भनिरोधक गोळ्या अर्थात काँट्रासेप्टिव्ह पिल्स (Contraceptive Pills) जास्त प्रमाणात घेणं हेदेखील तरुण महिलांना हृदयविकार होण्याचं एक प्रमुख कारण आहे. कारण या गोळ्यांमुळे हॉर्मोन्सवर विपरीत परिणाम होतो. हॉर्मोन्सची पातळी बदलली, तर रक्तदाब बदलू शकतो. त्यामुळे महिलांच्या हृदयावर अधिक ताण येऊ शकतो. या पिल्स जास्त प्रमाणात घेतल्यामुळे महिलांच्या रक्तात गुठळ्याही होऊ शकतात. तसं झालं तर हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत.

  आजची जीवनशैली (Lifestyle) हे हृदयविकाराचं सर्वांत मोठं कारण आहे. वेळेवर न जेवणं, कम्प्युटरसमोर कित्येक तास बसून राहणं, शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा अभाव या सगळ्यामुळे हळूहळू हृदयाचे स्नायू कमजोर होतात. ते हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. तसंच, अन्य अनेक विकारही यामुळे होतात. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तरुणींनीच नव्हे, तर सर्व वयोगटातल्या स्त्री-पुरुषांनी आपली जीवनशैली सुधारावी आणि तशी अंमलबजावणी करावी. त्यामुळे हृदयविकार दूर राहायला मदत होईल.

  First published:
  top videos

   Tags: Heart Attack, Tips for heart attack