मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

पुरुषांच्या या 5 सवयी महिलांना कधीच नाहीत आवडत; कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत वाढतात वाद

पुरुषांच्या या 5 सवयी महिलांना कधीच नाहीत आवडत; कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत वाढतात वाद

येथे आम्ही पुरुषांच्या अशा काही सवयींचा उल्लेख करणार आहोत, ज्या महिलांना अजिबात सहन होत नाहीत आणि तुमच्या नाजूक नात्यामध्ये निखारे येऊ लागतात. जाणून घेऊया अशा (Women Do Not Like These Habits Of Men) सवयींविषयी.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 13 ऑगस्ट : नात्यामध्ये तुमची प्रत्येक सवय जोडीदाराला आवडेलच किंवा तुमची प्रत्येक सवय तिला त्रास देईलच, असेही नाही. पण, अशा काही सवयी आहेत, ज्या आपल्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नजरेत सहज पडू शकता. या वाईट सवयींमुळे अनेक वेळा पार्टनर तुमच्याकडे संशयाने बघू लागतो किंवा तुमच्याशी पारदर्शकता दाखवू शकत नाही. अशा स्थितीत नातं ओझं बनतं आणि एकत्र राहणं एखाद्या शिक्षेपेक्षा कमी वाटत नाही. येथे आम्ही पुरुषांच्या अशा काही सवयींचा उल्लेख करणार आहोत, ज्या महिलांना अजिबात सहन होत नाहीत आणि तुमच्या नाजूक नात्यामध्ये निखारे येऊ लागतात. जाणून घेऊया अशा (Women Do Not Like These Habits Of Men) सवयींविषयी. महिलांचा अनादर - असे बरेच पुरुष आहेत जे स्त्रियांना चांगले वागवत नाहीत. इतकंच नाही तर अनेक वेळा ते आपल्या महिला जोडीदारावरही वर्चस्व गाजवायचा नाहक प्रयत्न करत असतात. पण, महिलांना तुमची ही सवय अजिबात आवडत नाही. अनादर करणाऱ्या जोडीदाराशी त्यांचे नाते फार काळ टिकत नाही किंवा टिकले तर तो फक्त समाजाला दाखवण्यासाठीचा व्यवहार असतो हे वाचा -  Numerology: जॉबचं टेन्शन आता सोडा! तुमची जन्मतारीख 'ही' असेल तर नोकरी पक्की समजा अस्वच्छता - बरेच पुरुष प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून असतात आणि त्यांना स्वच्छतेमध्ये रस नसतो. ते स्वतःचीही स्वच्छता करत नाहीत किंवा त्यांच्या सभोवतालच्या स्वच्छतेमध्ये रस दाखवत नाहीत. महिलांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत. स्वच्छतेमुळे त्यांच्यात अनेकदा भांडणे, वाद होतात आणि हे प्रकरण नाते तुटण्यापर्यंतही जाऊ शकतं. मुलींशी इश्कबाज - महिलांनाही अशी मुले आवडत नाहीत जी रिलेशनशिपमध्ये असूनही इतर मुलींसोबत फ्लर्ट करण्याची संधी शोधतात. त्यामुळे महिला पार्टनरला तुम्ही नात्याबाबत गंभीर नाही, असा संदेश जातो. पुरुषाच्या या सवयीमुळे महिलांना नेहमी असुरक्षित वाटते. स्त्री जोडीदाराच्या मित्राकडे लक्ष देऊ नका काही पुरुषांना त्यांची पत्नी किंवा पत्नीच्या मैत्रिणींबद्दल अनेकदा कंम्पर्टेबल वाटत नाहीत. पण त्यांच्या या वागण्याने त्यांच्या जोडीदाराला वाईट वाटेल याचा ते विचार करत नाहीत. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या मित्रांना वारंवार इग्नोर करू नका. हे वाचा - तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य खोटे बोलणे - काही पुरुषांना प्रकरण तिथेच खोटे बोलून संपवायचे असते. पण असे केल्याने महिला जोडीदाराचा विश्वास तुटतो आणि नात्यातील पारदर्शकता कमी होऊ लागते. महिलांना अशा कृती अजिबात आवडत नाहीत.
First published:

Tags: Relationship, Relationship tips

पुढील बातम्या