मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

स्तनांच्या आकाराची लाज वाटू देऊ नका! ‘सीना तान के चलो’ न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला निरोगी कानमंत्र

स्तनांच्या आकाराची लाज वाटू देऊ नका! ‘सीना तान के चलो’ न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला निरोगी कानमंत्र

पुरुष आणि महिलांच्या शरीर रचनेचा विचार केला तर, दोघांनाही स्तन असतात. पण महिला स्तनांच्या आकाराबाबत फारच कॉन्शियस असतात. त्यातून गंभीर परिणाम होऊ शकतात. ऋजुता दिवेकर यांनी सोपे व्यायाम सांगून एक चांगला कानमंत्र दिलेला पाहिलात का?

पुरुष आणि महिलांच्या शरीर रचनेचा विचार केला तर, दोघांनाही स्तन असतात. पण महिला स्तनांच्या आकाराबाबत फारच कॉन्शियस असतात. त्यातून गंभीर परिणाम होऊ शकतात. ऋजुता दिवेकर यांनी सोपे व्यायाम सांगून एक चांगला कानमंत्र दिलेला पाहिलात का?

पुरुष आणि महिलांच्या शरीर रचनेचा विचार केला तर, दोघांनाही स्तन असतात. पण महिला स्तनांच्या आकाराबाबत फारच कॉन्शियस असतात. त्यातून गंभीर परिणाम होऊ शकतात. ऋजुता दिवेकर यांनी सोपे व्यायाम सांगून एक चांगला कानमंत्र दिलेला पाहिलात का?

  • Published by:  News18 Desk

मुंबई: आरोग्याविषयी अजूनही काही गोष्टी उघडपणे बोलण्याची समाजात स्त्रियांना लाज वाटते. मासिक पाळी हे त्यापैकी एक, तसेच स्तनांविषयी त्याच्या आकाराविषयी अनेक गैरसमज असतात. स्त्री असो की पुरुष सर्वांनाच स्तन असतात. वयात येताना स्तनांची वाढ होउ लागते. स्तनांची वाढ होऊ लागताच मुली आपलं बॉडी पोश्चर बदलतात. काहींना ऑकवर्ड वाटतं म्हणून तर काही सवयीने. पण त्यामुळे त्याचे दुष्परिणाम मुलींनाच सहन करावे लागतात. ‘सिना तान के चलो’ असा सल्ला ऋजुता दिवेकर या प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट देतात. ऋजुता सेलिब्रेटी डाएटेशियन आणि योगा प्रॅक्टिशनर आहेत. त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओंना लाखो फॉलोअर्स आहेत.

सेलिब्रेटी डायटिशन ऋतुजा सांगतात, "वयात येताना मुलींच्या शरीरात होणाऱ्या अनेक बदलांपैकी एक बदल महणजे स्तनांचा आकार वाढणे, स्तन मोठे होऊ लागले की मुलींना ऑकवर्ड (Guilty Fill) वाटायला लागतं. आपल्या स्तनांची वाढ कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी मुली चालण्याची पद्धत बदलतात. पोक काढून, छाती आत घेऊन चालतात. त्यामुळे भविष्यात शरीरावर दुष्परिणाम होतात.

काय आहेत दुष्परिणाम ?

1 स्नायूंना बाक येणे.

पाठीचे स्नायु आपल्या शरीराला ताठरता देतात. पाठीच्या स्नायुंना ट्रॅप किंवा लॅक्ट्स म्हणतात. पण जेव्हा स्तनांचा आकार लपवण्यासाठी मुली, महिला वाकून चालालयला लागतात. तेव्हा त्या स्नायुंना बाक येतो. खांदे खाली वाकल्यासारखे वाटता. पाठिला पोक येण्यास सुरुवात होते.

2 पॅक्स लूज होणे

आपले स्तन आणि मानेच्या मध्ये जे स्नायु असतात त्यांना पेक्स म्हणतात. पॅक्स स्तनांना ताठ (Hold the breast tissue) ठेवण्याचं काम करतात. वाकून चालल्यामुळे ते स्नायू लूज होतात. त्यामुळे स्तनांचा आकार बदलतो. स्तन लूज होतात.

3 मान दुखणे

पोक काढून चालण्याने मणक्याचे आजार होऊ शकतात. मानेच्या हाडांमध्ये गॅप होऊन मान दुखीचाही त्रास होते. खांद्याची (Shoulder Bones) लवचिकता कमी होते. या सवयीदमुळे उतार वयात सतत डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत राहते

4 आत्मविश्वास गमावणे

स्तनांची वाढ होतांना मुलींचं लक्ष त्याकडेच वेधलेलं राहतं. आपल्यात होणाऱ्या बदलांबद्दल अपराधीपणाची भावना बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. आपल्याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे असं वाटत राहते. जास्त विचार करण्याने मनावर ताण येणे, झोप कमी होणे, डिप्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात.

(Corona Vaccine घेण्याआधीच कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत आता काय करू?)

5 मायग्रेन, डोकेदुखी

मान खाली करुन चालण्याने डोके दुखीचा त्रास होतो. कधीकधी हा त्रास वाढून मायग्रेनही होऊ शकतो. त्यामुळे औषध घ्यावी लागल्यास पुन्हा त्याचा दुष्परिमही शरीरालाच भोगायला लागतात. एँसिडीटीचाही त्रास होऊ शकतो.

6 फुफ्फुसावर परिणाम

जेव्हा आपण स्तन लपवण्यासाठी बाक काढून चालालयला लागतो. तेव्हा आपण आपल्या छातीचा भाग आत ओढत असतो. त्यामुळे श्वसन संस्थेवर परिणाम होतो. श्वसन क्रिया संथ होते. त्याने फुफ्फुस कमजोर बनता. रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो. दम लागणे, अशक्तपणा वाटणे सुरु होते.

स्कुटीवर 180 किमी प्रवास करून कर्तव्यावर परतली देशाची डॉक्टर लेक

जरी हे सगळे परिणाम तात्काळ दिसत नसले तरी भविष्यात काही वर्षांनी या समस्या उद्भवतात. त्यामुळे या सगळ्या त्रासातुन वाचण्यासाठी शरीरातील बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जा. इतर अवयांप्रमाणे ब्रेस्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. ‘सिना तान के चलो’ असं ऋतुजा दिवेकर सांगतात.

First published:

Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Tips, Wellness, Women