फोबिया! किटाणूंची वाटते भीती, अख्खं सुपरमार्केट घेते भाड्याने

फोबिया! किटाणूंची वाटते भीती, अख्खं सुपरमार्केट घेते भाड्याने

एका महिलेला किटाणूंची इतकी (Woman fears bacteria so much that rents out super market for shopping alone) भीती वाटते की शॉपिंग करण्यासाठी ती अख्खं सुपरमार्केटच भाड्याने घेऊन टाकते.

  • Share this:

एका महिलेला किटाणूंची इतकी (Woman fears bacteria so much that rents out super market for shopping alone) भीती वाटते की शॉपिंग करण्यासाठी ती अख्खं सुपरमार्केटच भाड्याने घेऊन टाकते. जगात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना सतत आपल्याला कुठलं ना कुठलं (Fear of infection) इन्फेक्शन होईल, याची भीती वाटत असते. त्यामुळे ते इतरांना भेटणं टाळतात आणि गर्दी ठिकाणी असलेल्या ठिकाणाकडे चुकूनही फिरकत नाहीत. शक्यतो माणसांच्या (Avoid people communication) संपर्कात येणं कसं टाळता येईल, याचाच विचार ते सतत करत असतात. एम्मा नावाच्या तरुणीचीही काहीशी अशीच गत झाली आहे.

सुपरमार्केट घेते भाड्याने

कोरोना काळानंतर तर एम्माची किटाणूंविषय़ीची भीती अधिकच वाढली आहे. तिला प्रत्येक आठवड्यात गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये जावं लागतं. मात्र सुपरमार्केटमध्ये इतर कुणी असताना आतमध्ये जायला तिला भीती वाटते. त्यासाठी तिनं अनोखा उपाय शोधून काढला आहे. ती साधारण एका तासासठी अख्खं सुपरमार्केट भाड्याने घेते आणि एकटीच आतमध्ये जाऊन शांतपणे शॉपिंग करते. या काळात इतर कुणालाही सुपरमार्केटमध्ये प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे एम्माला निर्धास्तपणे वस्तू खरेदी करता येतात. आठवड्यातून किंवा दहा दिवसांतून एकदा तासाभराचा वेळ काढून ती आपलं शॉपिंग पूर्ण करते.

हे वाचा- व्यापाऱ्यावर भर बाजारपेठेत गोळीबार, हल्ल्याच्या दहशतीने मार्केट बंद

आजार नव्हे भीती

अनेकांना असं वाटेल की एम्माला किटाणूंचा त्रास होतो किंवा त्यामुळे ती आजारी पडत असल्यामुळे असं करते. असं अजिबात नाही. तिला केवळ किटाणूंची भीती वाटत असल्यामुळे ती असं करते. याचा तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सोशल लाईफवरही परिणाम झाला आहे. तिच्या कुटुंबातील कुणालाही त्यामुळे पर्यटनाला जाणं किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं शक्य होत नाही. सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जाणं किंवा फिरायला मॉलमध्ये जाणं या बाबीदेखील तिच्या आयुष्यातून कायमच्या हद्दपार झाल्याचं ती सांगते. मात्र त्याचं आपल्याला वाईट वाटत नसून तीच आपली लाईफस्टाईल असल्याची प्रतिक्रिया एम्मीनं दिली आहे.

Published by: desk news
First published: November 21, 2021, 6:53 PM IST

ताज्या बातम्या