मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कसं शक्य आहे! बटर, चीझवर मारला ताव; बिलकुल केली नाही एक्सरसाईझ; तरी महिलेने घटवलं 50 किलो वजन

कसं शक्य आहे! बटर, चीझवर मारला ताव; बिलकुल केली नाही एक्सरसाईझ; तरी महिलेने घटवलं 50 किलो वजन

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ज्यामुळे वजन वाढेल या भीतीने आपण खात नाही, तेच खाऊन ही महिला फॅटची फिट झाली.

उटावा, 01 मे :  वजन कमी करायचं म्हटलं की चीझ, बटर असे पदार्थ खाणं आपण टाळतोच आणि एक्सरसाइझवर जास्तीत जास्त भर देतो (Weight loss tips). पण तुम्हाला आश्चर्य वाटेल नेमकं याच्या उटल करूनच एका महिलेने वजन घटवलं आहे. म्हणजे तिने चीझ, बटर असे पदार्थ खाऊन आणि त्यानंतर एक्सरसाइझ न करताही तब्बल 50 किलो वजन कमी केलं आहे. कॅनडाच्या ओंटारियोत राहणाऱ्या 39 वर्षांच्या एलिस बेलीने आपली वेटलॉस जर्नी लोकांसोबत शेअर केली आहे (Weight loss by eating).

ऐलिसने तसं वजन कमी करण्याचा विचार कधीच केला नव्हता. कारण तिच्या नवऱ्याने तिला ते कधी जाणवूच दिलं नाही. पण जेव्हा 2020 साली तिने आपला वेडिंग गाऊन ट्राय केला तेव्हा त्यात ती फिट बसत नव्हती. तिला तो होतच नव्हता, त्यामुळे तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - OMG! फक्त विचारानेच Fat To Fit केलं, 110 किलोची महिला 59 किलोची झाली; सांगितली Weight Loss Trick

पण यासाठी तिने आपल्या खाण्यावर कंट्रोल केला नाही, जीममध्ये गेली नाही ना घरच्या घरी एक्सरसाइझ केली. वजन कमी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये तिने आपले आवडीचे पदार्थ बनवले आणि खाल्ले. ऐलिसने सांगितलं, बटर, तूप असे आवडीचे पदार्थ खाऊन तिने सहजपणे 50 किलो वजन घटवलं आहे. तिला एक्सरसाइझ करण्याचीही गरज पडली नाही.

आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर ऐलिसने फक्त एक डाएट फॉलो केलं ते म्हणजे किटो डाएट. या डाएटमध्ये तिचे सर्व आवडीचे पदार्थ होते. ती अॅव्होकाडो, चिकन, मासे, दही, बटर, तूप, चीझ आणि डार्क चॉकलेटही खायची. ऐलिस म्हणाली, किटो सुरुवातीच्या दिवसात खूप कठिण गेलं. पण एकदा बॉडी किटोसिसमध्ये गेली त्यानंतर तिला कोणतीच समस्या उद्भवली नाही. चार वर्षांच्या मुलासोबत घरकाम करून तिने वजन कमी केलं.

हे वाचा - 'ही' आहेत वजन वाढण्याची 4 मुख्ये कारणे,तुमच्याकडून तर होत नाहीय ना ही चूक?

ऐलिस वेट लॉस जर्नीला दोन वर्षे झाली अजूनही ती आपलं वजन कमी करते आहे. तिच्या नवऱ्यालाही तिच्या हा नवा लूक पाहून विश्वास बसत नाही आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Weight, Weight loss, Weight loss tips