मराठी बातम्या /बातम्या /heatlh /थंडीमध्ये करू नका या चुका, आरोग्यावर होतील गंभीर परीणाम!

थंडीमध्ये करू नका या चुका, आरोग्यावर होतील गंभीर परीणाम!

सध्या थंडीचा सिझन (Winter Season) सुरू झाला आहे. थंडीचा सामना करण्यासाठी ठेवणीतले स्वेटर, शाली, टोप्या, हातमोजे अशी सगळी आयुधं बाहेर निघाली आहेत. त्याचबरोबर गरमागरम चहा, कॉफी, गरम पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सध्या थंडीचा सिझन (Winter Season) सुरू झाला आहे. थंडीचा सामना करण्यासाठी ठेवणीतले स्वेटर, शाली, टोप्या, हातमोजे अशी सगळी आयुधं बाहेर निघाली आहेत. त्याचबरोबर गरमागरम चहा, कॉफी, गरम पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सध्या थंडीचा सिझन (Winter Season) सुरू झाला आहे. थंडीचा सामना करण्यासाठी ठेवणीतले स्वेटर, शाली, टोप्या, हातमोजे अशी सगळी आयुधं बाहेर निघाली आहेत. त्याचबरोबर गरमागरम चहा, कॉफी, गरम पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे.

  मुंबई, 28 नोव्हेंबर : सध्या थंडीचा सिझन (Winter Season) सुरू झाला आहे. थंडीचा सामना करण्यासाठी ठेवणीतले स्वेटर, शाली, टोप्या, हातमोजे अशी सगळी आयुधं बाहेर निघाली आहेत. त्याचबरोबर गरमागरम चहा, कॉफी, गरम पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे. सकाळी आंघोळ करण्यासाठी कडकडीत पाणी वापरलं जाऊ लागलं आहे; पण यातल्या काही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. थंडीत आपल्या आरोग्याची (Health) योग्य काळजी घेण्यासाठी काही चुकीच्या सवयी टाळणं गरजेचं आहे.

  सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अति गरम पाण्याने आंघोळ (Very Hot Water Bath) करणं टाळलं पाहिजे. अनेक जण थंडीच्या दिवसात अगदी कडकडीत पाण्याच्या शॉवरखाली खूप वेळ उभे राहतात किंवा अनेक बादल्या गरम पाण्याने आंघोळ करतात. याचा आपल्या त्वचेवर आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. गरम पाण्यामुळे त्वचेवरच्या केरॅटिन नावाच्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. खाज येणं, पुरळ येणं असे त्रास होतात. त्यामुळे साधारण गरम पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे.

  थंडीच्या दिवसांत सगळीकडे एक गोष्ट समान असते, ती म्हणजे गरमागरम चहा (Tea), कॉफीचं (Coffee) कप रिचवणं. एरव्ही सकाळी एक किंवा दोन कप चहा पिणाऱ्या व्यक्ती थंडीच्या दिवसात तीन ते चार कप चहा पितात. संध्याकाळीही हाच प्रकार दिसून येतो. रात्री उशिरादेखील अनेक जण चहाचे अनेक कप रिकामे करतात. चहा-कॉफीचं वाढलेलं प्रमाण तात्पुरती ऊब देतं; पण अति प्रमाणात शरीरात जाणारं कॅफिन (Caffein) आरोग्याच्या दृष्टीनं घातक असतं. दिवसभरात दोन ते तीन कपांपेक्षा अधिक चहा किंवा कॉफी पिणं योग्य नाही.

  अनेक जण थंडीच्या दिवसांत घराबाहेरच पडत नाहीत. काही ठिकाणी प्रचंड थंडी असते, अशा ठिकाणी जाडजूड पांघरूण घेऊन खूप जण अगदी सूर्य चांगला वर येईपर्यंत झोपून राहतात. दिवसभरदेखील हवा थंड असल्यानं ते घराबाहेर जात नाहीत. संध्याकाळी, रात्री थंडीचा कडाका वाढत असल्यानं घराबाहेर जाणं टाळलं जातं. यामुळे शरीराला सूर्यप्रकाशातून (Sunlight) मिळणारं डी-थ्री व्हिटॅमिन (Vitamin D-3) मिळत नाही. अनेक जण व्यायाम करणंही टाळतात. थंडीमुळे सकाळी चालणं, सायकलिंग करण्याचा कंटाळा केला जातो. यामुळे शरीराची हालचाल कमी झाल्यानं या दिवसात जाडी (Weight gain) वाढते.

  थंडीच्या दिवसांत दिवस लहान आणि रात्र मोठी असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या ते पथ्यावरच पडतं. रात्र मोठी आणि दिवस लहान असल्यानं आपल्या शरीराचं सरकॅडियन सायकलही बिघडतं. शरीरात झोपेसाठी उपयुक्त ठरणारं मेटालोनीन हॉर्मोन अधिक प्रमाणात निर्माण होतं. यामुळे सुस्तपणा येतो, सारख्या जांभया येतात, त्यामुळे वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठण्याचं चक्र सांभाळणं आवश्यक आहे.

  या दिवसात भूकही जास्त लागते, त्यामुळे चटपटीत, गरम पदार्थ वारंवार खाल्ले जातात. हॉट चॉकलेटसारखे अधिक कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ले जातात. शारीरिक हालचाल कमी असल्यानं जाडी वाढण्यास मदत होते. यासाठी भूक लागल्यावर फायबरयुक्त पदार्थ , फळं खाणं आवश्यक आहे.

  थंडीच्या दिवसात अनेक जण पाणी (Less Water) अतिशय कमी पितात. अनेकांना तहानही (Thirst) कमी लागते; मात्र मूत्रविसर्जन, घाम आणि पचन याद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर टाकलं जातं. त्यात कमी पाणी शरीरात गेलं, तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. किडनी आणि पचनसंस्थेवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

  थंडीत अनेक जण एकावर एक अनेक कपड्यांचा थर चढवतात. स्वेटर, कानटोपी, ग्लोव्ह्ज, मफलर, सॉक्स यांनी आपलं सगळं शरीर अगदी गुरफटून टाकतात. यामुळे शरीराचं तापमान आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते. याचा परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. थंडीच्या दिवसात थंडी लागली, की आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती (Immune System) पांढऱ्या पेशी निर्माण (White Blood Cells) करू लागते. त्यामुळे आजारपण, संसर्ग यांपासून आपलं संरक्षण होतं. शरीराचं तापमान अधिक वाढल्यास या प्रकियेवर परिणाम होतो. अनेकदा थंडीमुळे झोप येत नाही. अशा वेळी हात-पाय सॉक्स घालून उबदार ठेवणं चांगलं आहे. यामुळे चांगली झोप लागू शकते; मात्र अति कपडे घालून शरीराचं तापमान जरूरीपेक्षा जास्त वाढवणं टाळावं.

  थंडीच्या दिवसात आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर या चुका टाळणं महत्त्वाचं आहे. गरम पाण्याने दीर्घ काळ आंघोळ करणं, उबदार कपड्यांत स्वतःला गुरफटून घेणं, कमी पाणी पिणं, सतत चहा-कॉफी पिणं, बाहेर जाणं टाळणं, व्यायामाला सुट्टी देणं या सगळ्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे लक्षात घेऊन योग्य आहार घेणं, व्यायाम करणं, योग्य वेळ झोप घेणं या गोष्टी पाळण्याकडे लक्ष द्यावं.

  First published:
  top videos