मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

तुम्हीही नखं चावताय का? सवय सोडवण्यासाठी हे उपाय करून बघा

तुम्हीही नखं चावताय का? सवय सोडवण्यासाठी हे उपाय करून बघा

How To Stop Nail Biting: हात कधी तोंडावर गेला हे त्या व्यक्तीला कळतही नाही. या सवयीला onychophagia म्हणतात. हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकते.

How To Stop Nail Biting: हात कधी तोंडावर गेला हे त्या व्यक्तीला कळतही नाही. या सवयीला onychophagia म्हणतात. हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकते.

How To Stop Nail Biting: हात कधी तोंडावर गेला हे त्या व्यक्तीला कळतही नाही. या सवयीला onychophagia म्हणतात. हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 ऑक्टोबर : अनेकांना दातांनी नखे चावण्याची आणि नखे कुरतडण्याची सवय असते. पुष्कळ लोक घाबरून नखं चावतात तर काहीजण नर्वस असताना नखं चावतात. नखे चावण्यामागची कारणे काहीही असली तरी ती चावल्याने आरोग्यावर नक्कीच नकारात्मक परिणाम होतो. ही एक अशी समस्या आहे, जी वयानुसार वाढते. हात कधी तोंडावर गेला हे त्या व्यक्तीला कळतही नाही. या सवयीला onychophagia म्हणतात. हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकते. अनेकजण दातांनी इतकी नखे चावतात की, त्यातून रक्त येऊ लागते. दात चावण्याचा प्रॉब्लेम कसा कमी करायचा, याविषयी जाणून घेऊ या.

लोक नखे का चावतात?

साधारणपणे नखे चावण्याची सवय लहान मुलांमध्येच दिसून येते. पण, काही तरुण आणि वयस्क लोकही असे करताना दिसतात. हेल्थ शॉट्सनुसार, नखे चावण्याच्या सवयीमागे चिंता आणि तणाव हे एक प्रमुख कारण असू शकते. ही सवय एखाद्या व्यक्तीमध्ये लहानपणापासूनच विकसित होते, जी मोठी झाल्यावर आणखी वाढू शकते. याशिवाय लोक कंटाळले असतानाही नखं चावत राहतात त्यांना रिकामे राहणे किंवा कोणाची वाट पहाणे आवडत नाही. मानवी मानसशास्त्राचे हे देखील याला कारण असू शकते.

इतर कारणे -

- परफेक्‍शन

- ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर

- निराशा

- नर्वसनेस

- ताण

अशी सवय सोडवा -

तणाव व्यवस्थापन : नखे खाण्याची सवय सोडवण्यासाठी तणाव कमी करणे आवश्यक आहे. ताण कमी असेल तर ती व्यक्ती स्वतःहून तोंडात बोट घालत नाही.

कडू नेलपॉलिश वापरा: ही सवय सोडवण्यासाठी नखांना कडू नेलपॉलिश वापरा. कडू नेलपॉलिशमुळे नखे खाणे टाळता येते. हातमोजेही वापरले जाऊ शकतात.

स्ट्रेस बॉल: जेव्हाही तुम्हाला नखे चावावी वाटेल, तेव्हा तुमचे हात कशात तरी व्यग्र ठेवा आणि बोट तोंडापासून दूर ठेवून मन दुसरीकडे वळवा. हात व्यग्र ठेवण्यासाठी स्ट्रेस बॉलचा वापर केला जाऊ शकतो.

हे वाचा - विजयादशमीला नक्की खा हे 5 गोड पदार्थ, वर्षभरासाठी मिळेल गूड लक

नखे लहान ठेवा : नखे पुन्हा पुन्हा तोंडात जाऊ नयेत म्हणून नखे लहान ठेवणे आवश्यक आहे. जर नखे लहान असतील तर त्यांना चावण्याचा त्रास होतो आणि हळूहळू नखे चावण्याची सवय सुटू शकते.

First published:

Tags: Health, Health Tips