Home /News /heatlh /

कोरोना ताप वाढला असतानाच Sepsis चा धोका; Cancer आणि Heart Attack पेक्षाही होऊ शकतात जास्त मृत्यू

कोरोना ताप वाढला असतानाच Sepsis चा धोका; Cancer आणि Heart Attack पेक्षाही होऊ शकतात जास्त मृत्यू

या Sepsis मुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्या लोकांना पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे.

    दिल्ली, 15 सप्टेंबर : आधीच कोरोना विषाणूने (Coronavirus) कहर केलेला असताना आता Sepsis नावाचा नवा Virus आल्याने पुन्हा एकदा लोकांचा जीव टांगणीत पडला आहे. कोरोनाकाळातल्या औषधोपचारांनी रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) कमी होते. आता अशा लोकांना नव्या विषाणूचा धोका आहे. या Sepsis मुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्या लोकांना पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅकपेक्षाही जास्त मृत्यू होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यासंदर्भाता आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) देशांना खबरदारीचा इशारा दिला असून त्यांसंदर्भात योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. आकडे काय सांगतात? डॉक्टर आणि आरोग्य विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 2050 पर्यंत हार्ट अटॅक आणि कॅंसरमुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांपेक्षा सेप्सिसने मरणाऱ्यांची संख्या जास्त असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते सेप्सिस (Sepsis) च्या संक्रमणाला सिंड्रोमिक रिएक्शन आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे आश्चर्यचकीत करणारे आहेत. त्यामुळे समोर आलेल्या संशोधनात या Virus मुळे जगभरात 2017 मध्ये सेप्सिसमुळे 4.89 कोटी केसेस आणि त्यातून 1.1 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यूंच्या आकड्यांची सरासरी ही 20 टक्के ऐवढी होती. Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका काय आहेत कारणं? समोर आलेल्या संशोधनात अफगाणिस्तान (Afghanistan) सोडून इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सेप्सिसमुळे होणाऱ्य़ा मृत्यूदराचे प्रमाण हे जास्त आहे. गुरुग्राममधील इंस्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अॅंड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता - द मेडिसिटीचे चेअरमन, यतिन मेहता यांच्या मते सेप्सिसमुळे 2050 पर्यंत हार्ट अटॅकच्या तुलनेत अधिक मृत्यू होतील. या रुग्णांना आहे अधिक धोका भारत सरकारचे माजी केंद्रीय आरोग्य सचिव लव वर्मा यांनी या विषयावर बोलताना म्हटलं आहे की सेप्सिसला अजून आरोग्य संघटनांकडून मान्यता मिळालेली नाही. ती मिळायला हवी. यासंदर्भात आता ICMR किंवा CME द्वारे काही विशिष्ट योजना आखण्याची गरज आहे, असं त्यांनी नमुद केलं आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Coronavirus, Health Tips, Who

    पुढील बातम्या