मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

महिलांनो तुमच्या अंगावरुन देखील सफेद स्त्राव होतो का? मग याकडे दुर्लक्ष करु नका, याची कारणं आणि उपाय जाणून घ्या

महिलांनो तुमच्या अंगावरुन देखील सफेद स्त्राव होतो का? मग याकडे दुर्लक्ष करु नका, याची कारणं आणि उपाय जाणून घ्या

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील महिलांसह किशोरवयीन मुलींनाही या समस्येचा सामना करावा लागतो. परंतू त्यात 25 ते 35 पर्यंत वयाच्या महिलांना याचा जास्त त्रास होतो, कारण या वयातच महिला तणाव, प्रेग्नेंसी, करिअर, लग्न या सगळ्या स्टेजमधून जातात आणि याच सगळ्या कारणांमुळे खरंतर व्हाईट डिस्चार्जच्या समस्या उद्भवतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Devika Shinde
मुंबई : मुलींमध्ये मासिक पाळी येण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे मुली मोठ्या झाल्या असं आपण मानतो. मासिक पाळी एकदा का येऊ लागली की मुलीच्या शरीरात खूप बदल होऊ लागता, एवढंच नाही तर त्याच्या हार्मोनल्समध्ये देखील बदल होऊ लागतात. बऱ्याच मुलींना अपूरं ज्ञानामुळे त्यांना आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांपैकीच एक आहे ते म्हणजे व्हाईट डिस्चार्ज किंवा अंगावरुन पांढरं स्त्राव जाणं. ज्याला वैद्यकीय भाषेत ल्युकोरिया म्हणतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील महिलांसह किशोरवयीन मुलींनाही या समस्येचा सामना करावा लागतो. परंतू त्यात 25 ते 35 पर्यंत वयाच्या महिलांना याचा जास्त त्रास होतो, कारण या वयातच महिला तणाव, प्रेग्नेंसी, करिअर, लग्न या सगळ्या स्टेजमधून जातात आणि याच सगळ्या कारणांमुळे खरंतर व्हाईट डिस्चार्जच्या समस्या उद्भवतात. तसे पाहाता थोडंफार व्हाईट डिस्चार्ज होणं सामान्य आहे. परंतू जेव्हा हे मोठ्या प्रमाणात होऊ लागतं, तेव्हा मात्र ती खूप मोठी समस्या असते. ज्यामुळे महिलांच्या गुप्तांना खाज येणे, इन्फेक्शन होणे यांसारख्या त्वचेशी संबंधीत समस्या देखील उद्भवतात. आता यावर उपचार काय आणि हे कशामुळे होतं? हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे, ज्यामुळे तुम्ही त्याला रोखू शकता. White Discharge Causes : महिलांमध्ये पांढरा स्त्राव होण्याची कारणं काय? 1. खाजगी भागाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे 2. ताण घेणे 3. सेक्शुअल इंटरकॉर्स 4. सतत अबॉर्शन होणं 5. गर्भपाताच्या गोळ्यांचा वापर 6. शरीरात पौष्टिकतेची कमतरता 7. दीर्घकाळापर्यंत रक्तस्त्राव 8. प्रएंटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड औषधांचा वापर 9. मासिक पाळीत बदल ही तर कारणं झाली, आता यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊ (White Discharge Complication) महिलांमध्ये पांढऱ्या स्त्रावाच्या समस्येमुळे इतर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जसे की पांढर्‍या स्रावामुळे अशक्तपणा येणे, चक्कर येणे, अति थकवा येणे इ. त्याचबरोबर पांढऱ्या स्त्रावामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये खाज, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्याही होऊ शकते. White Discharge home remedies : पांढरा स्त्रावावर घरगुती उपचार 1. केळी खा जर मुलींना कमी वयात पांढरा स्त्राव होत असेल, तर त्यांनी नाश्त्यात केळी खावी. नाश्त्यात केळीचे सेवन केल्याने महिलांच्या पांढर्‍या स्रावाच्या समस्येवर मात करता येते. पांढऱ्या पाण्याच्या या घरगुती उपायासाठी एक पिकलेलं केळ देशी तुपासोबत खा. 2. आवळा आवळा खाल्याने व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक मिळतात. आवळा शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतो आणि अनेक गंभीर आजारांना दूर ठेवतो. पांढऱ्या स्त्रावपासून सुटका मिळवण्यासाठी आवळा कच्चा, चूर्ण किंवा मुरंबा स्वरूपात खाऊ शकतो. 3. भेंडी पांढर्‍या स्रावाच्या समस्येवर भेंडी एक सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी तुम्ही प्रथम भेंडी पाण्यात उकळा आणि नंतर ते पाणी प्या. 4. धणे पांढर्‍या स्रावापासून आराम मिळवण्यासाठी महिला धणे देखील खाऊ शकतात. या घरगुती उपायासाठी धणे एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी प्या. हा पांढर्‍या स्रावावर एक सोपा उपाय आहे. 5. मेथी दाणे मेथीचे दाणे पाण्यात उकळून प्यायल्याने पांढऱ्या स्रावापासून आराम मिळतो. या घरगुती उपायासाठी अर्धा लिटर पाण्यात मेथीचे दाणे उकळवा आणि पाणी हे पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि ते थंड करून प्या. (विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
First published:

Tags: Digital prime time, Marathi news, Sexual health, Women

पुढील बातम्या