ब्रिटन, 24 मार्च : ओ माय गॉड किती हँडसम आहे तो किंवा किती ब्युटीफूल आहे ती, असं म्हणत अभिनेता आणि अभिनेत्रींनी चक्कर येऊन खाली कोसळल्याचा सीन तुम्ही बहुतेक फिल्ममध्ये पाहिला असेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एका तरुणीच्या बाबतीत मात्र हे प्रत्यक्षात घडतं. एखादी आकर्षक व्यक्ती आली की तिचा तोलच ढासळतो (woman loss control after see attractive person) आणि ती तिथंच जमिनीवर कोसळते.
ब्रिटनच्या चेशायरमध्ये राहणारी 32 वर्षांची क्रिस्टी ब्राऊन. तिच्यासमोर एखादी आकर्षक व्यक्ती आली की तिचे पाय थरथरू लागतात. तिने स्वतःला सावरलं नाही तर तिला जमिनीवर कोसळण्याची भीती असते. हे सर्वकाही ती मुद्दामहून करते असं नाही तर तिला एक विचित्र अशी समस्या आहे.
क्रिस्टीला केटाप्लेक्सी (cataplexy) आहे. हा एक डिसॉर्डर आहे. यामध्ये राग, आनंद आणि भीती अशा भावना तीव्र भावनांमुळे अटॅक येतो आणि शरीराचा तोल राहत नाही. पॅरालेसिस झाल्यासारखी परिस्थिती उद्भवते.
हे वाचा - अरे बापरे! खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि छातीतून निघालं चक्क कंडोम
क्रिस्टीने सांगितलं, जेव्हा मी कोणत्याही आकर्षक व्यक्तीला पाहते तेव्हा माझे पाय थरथर कापू लागतात. मला खाली पडण्याची भीती असते. त्यामुळे मी कधीच वर पाहत नाही. सार्वजनिक ठिकाणी मी नेहमी खाली बघूनच चालते. राग आला, जास्त हसल्यानंतरही मी अशीच जमिनीवर कोसळते कारण या तीव्र भावना आहेत. जेव्हा ती वाद घालते तेव्हा ती बेशुद्धच होते. जेव्हा मला अटॅक येतो तेव्हा माझ्या पायावर नियंत्रण राहत नाही.
क्रिस्टीने सांगितल्यानुसार दिवसातून तिला सामान्यपणे कमीत कमी पाच आणि जास्तीत 50 केटाप्लेक्सीचे अटॅक येतात. हे अटॅक दोन मिनिटांपुरते असते. पण यामुळे तिला घराबाहेर पडणंही अशक्य होतं.
हे वाचा - OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
या डिसॉर्डरला नारकोलेप्सीसोबत जोडलं जातं. क्रिस्टी नारकोलेप्सी जीनसोबत जन्माला आली आहे. वयाच्या नवव्या वर्षी तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिची समस्या जास्त वाढली, असं तिनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Serious diseases