मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Fever Primary Care : ताप आल्यावर काय करावं? घरी प्राथमिक काळजी कशी घ्यावी?

Fever Primary Care : ताप आल्यावर काय करावं? घरी प्राथमिक काळजी कशी घ्यावी?

वातावरणातील बदलांबरोबरच इतर एखाद्या आजारामुळेही वारंवार ताप येऊ शकतो. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अनेक प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी कठोर परिश्रम करते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 23 जुलै : हवामानातील बदलामुळे ताप येणे ही सामान्य समस्या आहे. तापेमुळे शरीरात वेदना होणे, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, थंडी वाजणे किंवा थरथरणे, भूक न लागणे, स्नायूंमध्ये क्रॅम्प, शारीरिक उर्जा कमी होणे इत्यादी त्रासांचा सामना माणसाला करावं लागतो. वातावरणातील बदलांबरोबरच इतर एखाद्या आजारामुळेही वारंवार ताप येऊ शकतो. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अनेक प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी कठोर परिश्रम करते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. आज आम्ही तुम्हाला ताप आल्यानंतर सर्वप्रथम घरी काय करावे हे सांगणार आहोत.

ताप आल्यावर अशी घ्या काळजी

- थर्मामीटरच्या साहाय्याने शरीराचे तापमान मोजा. तुमचे तापमान 100.4°F (38°C) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ताप आला आहे आणि काळजी घेण्याची गरज आहे.

Heartburn : तळलेले पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळतंय; घरगुती उपायांनी मिळवा आराम

- ताप आल्यानंतर तुम्ही अराम करणे आवश्यक आहे. ताप असताना आपल्या शरीरातून ऊर्जा कमी होत असते. त्यामुळे तुम्ही अराम न केल्यास तुम्हाला जास्त अशक्तपणा येऊ शकतो.

- ताप आल्यानंतर घामामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पाणी, किंवा अतिशय पातळ केलेला फळांचा ज्यूस प्यावा.

- ताप आल्यानंतर थंड पाण्याची पट्टी कपाळावर ठेवावी. यामुळे ताप कमी होतो. जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा ते डोके आणि हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. थंड पाण्याची पट्टी ठेवल्याने आपले डोके आणि हृदय सुरक्षित राहते.

- तापेमुळे आपले अंग तापते. अशावेळी सध्या पाण्याने दोन तीन वेळा आपले अंग पुसा. यामुळे शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते.

- ताप आलेली असताताना तुम्ही कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्त हवेमध्ये बसू नये आणि खूप जास्त कपडे अंगावर घेऊनही बसू नये. तुम्हाला ज्या परिस्थिती जास्त कम्फर्टेबल वाटते त्या स्थितीत आराम करावा.

 Acid Reflux: जेवणानंतर छातीत होतेय जळजळ? अॅसिड रिफ्लेक्समध्ये असे उपाय ठरतील फायदेशीर

- सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट, ताप कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपचारांचाही उपयोग करू शकता. मात्र शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. ताप जास्त प्रमाणात असेल किंवा कमी होत नसेल तर डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

(या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle