Home /News /heatlh /

प्रवास करताना कोरोनाचा धोका; व्हायरसपासून बचाव करण्याचे सोपे मार्ग

प्रवास करताना कोरोनाचा धोका; व्हायरसपासून बचाव करण्याचे सोपे मार्ग

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

कोरोना काळात (Travelling During the Corona period) प्रवास करावा लागल्यास योग्य काळजी घ्यायला हवी. काळजी न घेतल्यास आपल्याबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींनाही धोका होऊ शकतो.

    मुंबई, 08 मे : कोरोनाच्या या काळात घरात राहणे म्हणजेच सुरक्षित राहणं आहे. सध्या देशातल्या अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांनी घराबाहेर पडावचं लागतं. काही काम असल्यास आपल्याला बाहेर जावं एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास सराव लागतो. ट्रेन किंवा विमानाने प्रवास करावा लागणार असेल. तर,अशा वेळेस योग्य काळजी न घेतल्यास कोरोना होण्याचा धोका वाढतो. कोरोना काळात प्रवास करावा लागल्यास योग्य काळजी घ्यायला हवी. काळजी न घेतल्यास आपल्याबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींनाही धोका होऊ शकतो. कोरोना काळात घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती घ्यायला हवी. कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क (Mask) वापरणं, हात धुणं (Hand washing), सोशल डिस्टन्सिंग (Social distanceहे  उपाय महत्त्वाचे मानले जातात. अत्यावश्यक वस्तू सोबत घ्या घराबाहेर पडणार असाल आणि प्रवास करणार असाल तर त्या प्रवासात लागणाऱ्या गोष्टी स्वत: बरोबर घ्या. म्हणजे कोणत्याही कारणाने तुम्हाला इतर ठिकाणी थांबावं लागणार नाही किंवा इतरांशी संपर्क कमी येईल. पाणी बॉटल, काही कागदपत्र, रुमाल, पिशवी यावस्तू स्वत:बरोबर ठेवा. मास्कचा वापर कोरोना संकट काळात बचावासाठी प्रभावी उपाय म्हणजे मास्क (Mask) वापरणं. चांगल्या प्रतीचा स्वच्छ मास्क वापरा. स्वत:बरोबर एक्स्ट्रा मास्क नेहमी ठेवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन मास्क घालायलाही सांगितलं जात आहे. बाजारात आता चांगल्या प्रतीचे मास्क उपलब्ध आहेत. मास्क व्यवस्थित आपलं नाक आणि हनुवटी झाकेल याची काळजी घ्या. आवश्यकता वाटल्यास फेसशिल्ड वापरा. (Homeopathic औषध Drosera 30 जीवघेणं ठरू शकतं? काय म्हणाले डॉक्टर पाहा) हातांची स्वच्छता प्रवासामध्ये आपला हात कोणत्याही गोष्टीला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासात हातांची स्वच्छता महत्त्वाची असते. कोरोनाचा विषाणू (Corona virus) हवेमधून पसरतो. त्यामुळे प्रवासातही हात धुण्याचा प्रयत्न करा. काही डॉक्टर सॅनिटायझर वापरण्याचाही सल्ला देतात. पण बाजारात बनावट सॅनिटायझरही उपलब्ध आहेत त्यामुळे चांगल्या क्वॉलिटीचं सॅनिटाझर वापरा. त्यामुळे कुठेही स्पर्श केल्याने कोरोनाचा विषाणू हातावर लागला असेल तर त्याचा नायनाट होईल. हँडग्लोव्हज प्रवास करतान हँडग्लोव्हजही (Handgloves) वापरू शकता. त्यामुळे तुमच्या हाताला कोरोनाचे विषाणू लागणार नाहीत. मात्र हँडग्लोव्हज वापरत असाल तरीही हात स्वच्छ करत रहा. त्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला तरी चालतो. हँडग्लोव्हज काढताना काळजी घ्या. त्याच्या बाहेरील भागाचा हाताच्या तळव्यांना स्पर्श होणार नाही याकडे लक्ष द्या. (Coronavirus Second Wave : बचावासाठी कोणता Mask वापरणं योग्य?) सोशल डिस्टन्सिंग कोरोना काळात बाहेर जाताना सोशल डिस्टन्सिंग (Social distanceपाळणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलताना कमीत कमी 2 मीटरचं अंतर ठेवा. या संदर्भातील गाईडलाईनचे पालन करा. बरेच लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. कोरोना टेस्ट कोरोनाचं संक्रमण पाहता सरकारने राज्यांमध्ये प्रवेश करताना RT-PCR टेस्ट बंधनकारक केली आहे. त्यामुळे तुमच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार असाल तर 72 तास आधी, RT-PCR टेस्ट करा. ट्रेन प्रवास किंवा विमान प्रवास करताना टेस्ट आवश्यक आहे. आवश्यकता असल्यासच प्रवास कोरोनाचं संक्रमण वाढत असताना शक्यतो प्रवास टाळा. प्रत्येक राज्यात कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. प्रवास करताना त्याची माहिती घ्या. आपण जात असलेलं ठिकाण किती सुरक्षित आहे याची पुर्व कल्पना असल्याशिवाय प्रवास करु नका. तातडीच्या उपाययोजनांसाठी संपर्कासाठी आवश्यकते फोन नंबर (Contact Number) जवळ ठेवा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Lifestyle, Travelling

    पुढील बातम्या