मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

प्री-डायबिटीज असेल तर डायबिटीज होण्याचा धोका जास्त; या गोष्टींची वेळीच घ्या काळजी

प्री-डायबिटीज असेल तर डायबिटीज होण्याचा धोका जास्त; या गोष्टींची वेळीच घ्या काळजी

प्री-डायबेटिस बहुतेक लोकांमध्ये मधुमेह होण्यापूर्वी होतो. त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि वर्षभरात प्री-डायबेटिसने ग्रस्त असलेले अनेक लोक नंतर मधुमेहाच्या विळख्यात सापडतात.

प्री-डायबेटिस बहुतेक लोकांमध्ये मधुमेह होण्यापूर्वी होतो. त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि वर्षभरात प्री-डायबेटिसने ग्रस्त असलेले अनेक लोक नंतर मधुमेहाच्या विळख्यात सापडतात.

प्री-डायबेटिस बहुतेक लोकांमध्ये मधुमेह होण्यापूर्वी होतो. त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि वर्षभरात प्री-डायबेटिसने ग्रस्त असलेले अनेक लोक नंतर मधुमेहाच्या विळख्यात सापडतात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 09 ऑगस्ट : प्रत्येकाने डायबिटीजबद्दल ऐकले असेल, परंतु आपल्याला प्री-डायबिटीजबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर प्रत्येकासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला प्री-डायबेटिस असेल, तरच डॉक्टरांशी संपर्क साधून चांगले उपचार केले, तरच मधुमेहाचा आजार टाळता येईल. एका अभ्यासानुसार, प्री-डायबेटिस बहुतेक लोकांमध्ये मधुमेह होण्यापूर्वी होतो. त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि वर्षभरात प्री-डायबेटिसने ग्रस्त असलेले अनेक लोक नंतर मधुमेहाच्या विळख्यात सापडतात. आज आम्‍ही तुम्‍हाला प्री-डायबिटीस बद्दल महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी सांगत आहोत, ज्या आपल्याला मधुमेहापासून वाचवू (Pre-diabetes Tips) शकतात. प्री-डायबेटिस म्हणजे काय? हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा किंचित जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. मात्र, या काळात ही पातळी मधुमेहापेक्षा कमी असते. टाइप - 2 मधुमेह होण्यापूर्वी लोकांमध्ये नेहमी प्री-डायबेटिस विकसित होतो. या स्थितीत, रक्तातील साखरेची पातळी वाढते कारण आपल्या शरीरात इन्सुलिन प्रतिरोधकतेची समस्या असते. प्री-मधुमेहाच्या काळात, आपले शरीर जास्त इन्सुलिन बनवते, परंतु काही काळानंतर अतिरिक्त इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. यानंतर साखरेचे प्रमाण अधिक वाढते आणि मधुमेहाचा आजार होतो. प्री-डायबेटिसमुळे मधुमेहाचा धोका जास्त - प्री-डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर योग्य वेळी उपचार न केल्यास मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना केवळ एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका 10 टक्के असतो. तर आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका 70 टक्क्यांपर्यंत असतो. प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येते. जे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात, त्यांची ही समस्या आपोआप संपुष्टात येऊ शकते. प्री-मधुमेह आणि मधुमेह कसे टाळावे? प्रत्येकाने आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. प्रत्येकाने आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) 18.5 ते 25 दरम्यान ठेवावा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. एरोबिक आणि स्ट्रेथनिंग एक्सरसाइज दररोज सुमारे 30 मिनिटे केले पाहिजेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करावा आणि अनारोग्यकारक गोष्टींचे सेवन टाळावे. साखरयुक्त पेये टाळावीत आणि कॅलरीज नियंत्रित ठेवाव्यात. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे जर आपण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत जर तुम्हाला वारंवार लघवी होणे, जास्त भूक आणि तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, प्रचंड थकवा आणि गोंधळ यांसारखी लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि मधुमेहाची चाचणी करून घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes

पुढील बातम्या