मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Health Insurance ठरेल कठीण काळातील मित्र, कोरोना पँडेमिकमध्ये आहे अधिकच महत्त्व; जाणून घ्या फायदे

Health Insurance ठरेल कठीण काळातील मित्र, कोरोना पँडेमिकमध्ये आहे अधिकच महत्त्व; जाणून घ्या फायदे

Health insurance: हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व काय आहे?

Health insurance: हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व काय आहे?

हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता अनेकांना अनाठाई वाटतो. परंतू, असे करणे म्हणजे आपण स्वत:ला अधिक आर्थिक जोखमीत टाकणे होय. म्हणूनच जाणून घ्या, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? (What is Health Insurance) तो का महत्त्वाचा असतो?

    नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: आरोग्य विमा (Health insurance Update) म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance Information) आज परीवलीचा शब्द झाला आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात हेल्थ इन्शुरन्स चे महत्त्व (Importance of Health Insurance during Coronavirus Pandemic) लोकांना अधिक कळले. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात असू शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा  हेल्थ इन्शुरन्स नव्हता त्यांना मात्र आपल्याच खिशातून बिल भरावे लागले. जर तुम्हाला वाढत जाणारं मेडिकल बिल भरण्यासाठी सेव्हिंगला हात लावायचा नसेल तर  जाणून घ्या, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? (What is Health Insurance) आणि तो का महत्त्वाचा असतो? हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपल्या कठीण काळातील मित्र हेल्थ इन्शुरन्स चे महत्व विचाराल तर थोडक्यात, आजारपण, आपत्कालीन स्थिती, आणि अनपेक्षित घटना या कधीही सांगून येत नाहीत. अशी परिस्थिती आल्यावर व्यक्ती किंवा कुटुंबावर पहिले संकट येते ते पैस्याचे, अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स आपल्या जवळ असला कि पैशांचा विचार न करता पीडित व्यक्ती चिंता मुक्त राहून पूर्ण उपचार घेऊ शकतो. हे वाचा-SIPमध्ये कशी कराल गुंतवणूक? असं प्लॅनिंग केल्यास तयार होईल 10.19 कोटींचा फंड व्यक्तिगतरित्या विचार केला तर आरोग्याशी संबंधित अडचणींचा परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे. आरोग्याशी संबंधित मुद्द्यांचा एखाद्या व्यक्तीवर वेगवेगळ्या तर्हेने परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण तर होतेच, त्याशिवाय वैद्यकीय उपचार, रुग्णालयात भरती आणि औषधांचा खर्च ह्या सगळ्या गोष्टींचा एखाद्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिकदृष्ट्याही मोठा परिणाम होऊ शकतो. हेल्थ इन्शुरन्स ह्या सर्वातून बचाव करू शकते. हे वाचा-सप्टेंबर महिन्यात 4%ने उतरलं सोनं, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी? हेल्थ इन्शुरन्सचे फायदे आणि महत्व आरोग्य विमा योजनेत केवळ हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीत झालेल्या खर्चाचा समावेश नाही, तर हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा खर्च देखील समाविष्ट केला जातो. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा कालावधी वेगवेगळ्या कंपन्या आणि योजनांनुसार बदलू शकतो. वाहतूक शुल्क आरोग्य विमा योजनेमध्ये रुग्णवाहिकेला दिलेल्या रकमेचाही समावेश असतो. नो क्लेम बोनस जर विमाधारकाने गेल्या एका वर्षात कंपनीमध्ये कोणत्याही उपचार किंवा कव्हरचा दावा केला नाही तर त्याला No Claim Bonus दिला जातो. हे वाचा-हद्दच झाली! ऑपरेशनवेळी डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे रूम, नर्सिंग, सर्जन इत्यादी फी आरोग्य विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयाच्या खोलीचे भाडे, नर्सिंग शुल्क, सर्जन शुल्क, सल्लागार शुल्क, विशेषज्ञ शुल्क, ऑपरेशन थिएटर शुल्क, आयसीयू शुल्क, ऑक्सिजन, शस्त्रक्रिया साधने, एक्स-रे इत्यादी शुल्क समाविष्ट असते. कर लाभ आरोग्य विमा योजनेसाठी भरलेली प्रीमियम रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत करमुक्त आहे. म्हणूनच, आरोग्य विमा काढल्याने कर वाचवण्यासाठी देखील आपल्याला मदत होते.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Health, Insurance

    पुढील बातम्या